शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी भातशेतीला दहा हजार वर्षांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 00:31 IST

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे

जगात भात खाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे त्याचे पीकही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आज जगात तांदूळ दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक क्षेत्रफळावर घेतले जाणारे पीक आहे. जगात भारत तांदळाचे पीक घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. अनेक मोठ्या राज्यांत तांदळाचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जाते. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, आसाम व पंजाब राज्यांना तांदळाचे पीक घेणारे राज्य समजले जाते.दक्षिण भारतात तांदूळ हे मोठ्या संख्येतील लोकांचे मुख्य अन्न आहे. त्याच्या पिकाबद्दल लोकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत; परंतु नुकतेच चीनचे लू होउयुआन यांनी आपल्या संशोधनात मोठा खुलासा केला आहे. लू होउयुआन इन्स्टिट्यूट आॅफ जिओलॉजी अँड जिओफिजिक्समध्ये संशोधन करतात. त्यांच्या संशोधनात एक बाब स्पष्ट झाली की, जेव्हा युग परिवर्तन घडत होते. पृथ्वी जेव्हा जुने युग म्हणजे प्लाइस्टसीनमधून नवे युग म्हणजे हेलोसीनमध्ये परिवर्तीत होत होते त्यावेळी परिस्थिती खूप गंभीर होती. पर्यावरणीय व भौगोलिक परिवर्तन वेगाने घडत होते.अशा त्या काळात दहा हजार वर्षे आधी हेलोसीनमध्ये नव्या वनस्पतीही विकसित झाल्या होत्या. त्यात तांदळाचीही उत्पत्ती झाली. या दरम्यान चीनने आपले देशांतर्गत उत्पादन सगळ्यात आधी सुरू केले. त्याने मोठ्या प्रमाणावर त्याची शेती सुरू केली होती. नुकतेच त्यांचे हे संशोधन नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्सेसचे यूएस प्रोसिडिंग्जमध्ये प्रसिद्ध झाले. चीनच्या झिंझियांग प्रांतचे चिनी विज्ञान अकॅडमीमध्ये अवशेष आणि पुरातत्व संस्थान, भौगोलिक विज्ञान संस्थान आणि नैसर्गिक संसाधन अनुसंधान संस्थानमध्ये या विषयात बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यावर तांदळाची शेती सगळ्यात आधी कुठे सुरू झाली, यावर भर आहे.