शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बांगलात मंदिरावर हल्ला, पुजाऱ्याचा खून

By admin | Updated: February 22, 2016 03:35 IST

उत्तर बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील देवगंज गावात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला. त्यात पुजारी जनेश्वर रॉय यांचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी

ढाका : उत्तर बांगलादेशातील पंचगढ जिल्ह्यातील देवगंज गावात एका हिंदू मंदिरावर हल्ला झाला. त्यात पुजारी जनेश्वर रॉय यांचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून करण्यात आला. यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन भाविकही जखमी झाले.पंचगढ जिल्हा भारतीय सीमेला लागून आहे. पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोर बहुधा तिघे होते आणि दुचाकीवरून आले होते. घटना घडल्यानंतर ते फरार झाले.भाविकांचा हवाला देऊन एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, प्रारंभी हल्लेखोरांनी मंदिरावर दगडफेक केली. त्यामुळे काय घडले हे पाहण्यासाठी पुजारी जनेश्वर रॉय बाहेर आले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर लगेचच हल्ला करून त्यांचा तीक्ष्ण हत्याराने खून केला; मात्र आपण पकडले जाऊ या भीतीने त्यांनी पळून जाण्यापूर्वी गोळीबार केला आणि देशी बॉम्ब फेकले. यावेळी पुजाऱ्याला वाचविण्यासाठी आलेले दोन जण गोळीबारात जखमी झाले. हल्लेखोरांची ओळख पटू शकली नाही किंवा पुजाऱ्याचा खून करण्यामागचा त्यांचा हेतूही कळू शकला नाही. पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.सुन्नीबहुल बांगलादेशात अलीकडील काही महिन्यांत धार्मिक अल्पसंख्याक समुदायावर सुुनियोजित हल्ले झाले आहेत. त्यात दोन विदेशी नागरिकांसह ९ जणांचा मृत्यू झाला असून, १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.