शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
3
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
4
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
5
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
6
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
7
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
8
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
9
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
10
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
11
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
12
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
13
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
14
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
15
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
16
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
17
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
18
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
19
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
20
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी

तैवान सरकारने मागितली मूळ निवासींची माफी

By admin | Updated: August 2, 2016 04:45 IST

तैवान सरकारने सोमवारी येथील मूळ निवासी असलेल्या १६ जमातींच्या लोकांची जाहीर माफी मागितली.

तैपेई : चीनच्या मुख्य भूमीवरून स्थलांतर करून आलेल्या आणि कालांतराने बहुसंख्य झालेल्या चिनी वंशाच्या शासकांनी गेली ४०० वर्षे केलेल्या घोर अन्यायाबद्दल तैवान सरकारने सोमवारी येथील मूळ निवासी असलेल्या १६ जमातींच्या लोकांची जाहीर माफी मागितली.याच मूळ निवासींच्या वंशाच्या असलेल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग-वेन यांनी अध्यक्षीय प्रासादात आयोजित केलेल्या एका खास समारंभात या मूळ निवासी जमातींच्या नेत्यांपुढे भावपूर्ण भाषण करून, त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्याय आणि हालअपेष्टांबद्दल दिलगिरी व्यक्त केली. एवढेच नव्हे तर राष्ट्राध्यक्षांनी सरकारच्या वतीने एक औपचारिक लेखी माफीनामाही सर्वात वयोवृद्ध मूळ निवासी नेत्यापुढे नतमस्तक होत त्याच्याकडे सुपूर्द केला.त्साई या मूळ निवासी वंशाच्या तैवानच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष आहेत. मूळ निवासी आणि स्थलांतरित बहुसंख्य यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी त्यांनी ही पुढाकार घेतला. मूळ निवासींवर झालेल्या अन्यायांची पद्धतशीर नोंद करून त्याचे निराकरण करण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका विशेष समितीच्याही त्या अध्यक्ष आहेत. समारंभात केलेल्या भाषणात त्साई म्हणाल्या, गेली ४०० वर्षे जो अन्याय व हालअपेष्टा सोसाव्या लागल्या त्याबद्दल सरकारच्या वतीने मी मूळ निवासींची मनापासून माफी मागते. ही माफी हा मूळ निवासींवर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने टाकलेले आणखी एक पाऊल आहे. इतिहासाकडे गांभीर्याने पाहून आपण सत्य समोर आणायला हवे, असेही त्यांनी नमूद केले.मूळ निवासी समुदायांना अधिक स्वायत्तता देण्याचे, त्यांच्या हिरावून घेतलेल्या जमिनी त्यांना परत करणे आणि त्यांच्या भाषा व संस्कृतीचे रक्षण करण्याचे वचनही त्साई यांनी दिले. राष्ट्राध्यक्षांनंतर बोलताना यामी जमातीचे ८० वर्षांचे पुढारी कापेन नगानायेन यांनी सरकारचे आभार मानले व साशंकताही व्यक्त केली. (वृत्तसंस्था)>तैवानच्या एकूण २.३५ कोटी लोकसंख्येत मूळ निवासींची संख्या जेमतेम दोन टक्के आहे.चिनी वंशाच्या स्थलांतरितांच्या लोंढयांमुळे त्यांच्या मूळ भाषा व संस्कृती लयाला गेल्या आहेत.तैवानच्या एकूण क्षेत्रफळापैकी दोन तृतीयांश जमीन मूळ निवासींची असूनही ती हडपून तेथे विकास केला गेला आहे.>मूळ निवासींची जी जमीन मोकळी आहे, ती राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केल्याने तेथे शेती, शिकार व मासेमारी करण्यावरून नेहमी संघर्ष होत असतात.आॅर्किड बेटावरील यामी जमातीच्या जमिनीवर आण्विक कचरा टाकल्याने ती निकामी झाली आहे.नोकरी-धंद्यांमध्ये त्यांचे प्रमाण नगण्य आहे, त्यांच्यात खूप बेरोजगारी आहे व त्यांना दिली जाणारी मजुरी राष्ट्रीय सरासरीहून ४० टक्के कमी आहे.