शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचे शेपूट वाकडेच! भारताच्या एनएसजी प्रवेशाबाबत भूमिकेत बदल नाही

By admin | Updated: May 22, 2017 16:26 IST

भारताच्या अणुपुरवठादार देशांच्या संघटनेतील (एनएसजी) प्रवेशात खोडा घालण्यासाठी चीनने पुन्हा एकदा कंबर कसली आहे

ऑनलाइन लोकमत 
बिजिंग, दि. 22 - भारताच्या अणुपुरवठादार देशांच्या संघटनेतील (एनएसजी) प्रवेशात खोडा घालण्यासाठी चीनने  पुन्हा एकदा कंबर कसली आहे.  पुढील महिन्यात होणाऱ्या एनएसजी सदस्य देशांच्या बैठकीपूर्वी भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाबाबतच्या आपल्या भूमिकेत कोणत्याही प्रकारचा बदल झाला नसल्याचे चीनने आज स्पष्ट केले आहे. चीनच्या या भूमिकेमुळे भारताचा एनएसजीमधील प्रवेश पुन्हा एकदा लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 
 गेल्या अनेक वर्षांपासून एनएसजीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र या संघटनेच्या नियमांनुसार नव सदस्य म्हणून भारताला प्रवेश देण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.  मात्र अण्वस्र प्रसार  बंदी करारावर (एनपीटी) सही न केलेल्या देशास एनएसजीचे सदस्यत्व देण्यास आपला विरोध कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या  हुआ चुनाइंग यांनी आज सांगितले. 
 
स्वीत्झर्लंडच्या राजधानीत होणाऱ्या एनएसजीच्या बैठकीत भारताला एनएसजीमध्ये प्रवेश मिळण्याबाबतच्या शक्यतेवर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  भारताने एनएसजी सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केल्यानंतर पाकिस्ताननेही  चीनच्या पाठिंब्यावर  एनएसजीच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला होता. 
 
भारताच्या एनएसजीमधील प्रवेशाला अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र चीनने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर सह्या केल्याशिवाय कुठल्याही नव्या देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.  भारताने अणवस्त्र प्रसारबंदी (एनपीटी) करारावर अद्याप सही केलेली नाही.