शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेवटची इच्छा सांगितल्यावर मिळाली फाशीच्या शिक्षेला स्थगिती

By admin | Updated: March 19, 2015 15:42 IST

फाशीची शिक्षा देण्यासाठी अवघ्या काही मिनीटांचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानमधील २४ वर्षीय तरुणाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली व तो बचावला.

ऑनलाइन लोकमत 

इस्लामाबाद, दि. १९ - लहान मुलाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, सरकारकडून हिरवा कंदील येताच तुरुंगप्रशासनाने त्याला शिक्षा देण्याची तयारी सुरु केली, त्याला पांढरे कपडे देण्यात, फाशीच्या तख्तापर्यंत तो पोहोचलाही होता, शेवटची इच्छा विचारण्यात आली पण तोपर्यंत ऐनवेळी त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यात व तो वाचला....

चित्रपटातील कथानकाप्रमाणे हा प्रसंग घडला पाकिस्तानमध्ये. पेशावर शाळेतील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी मागे घेतली आहे. यानिर्णयानंतर पाकिस्तानमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याचा सपाटा सुरु आहे. इस्लामाबादमधील लहान मुलाच्या हत्येप्रकरणी शफाकत या तरुणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २००४ मध्ये ही हत्या झाली होती व त्यावेळी  शफाकत अवघ्या १४ वर्षांचा होता. हत्येप्रकरणी अटक झाली तेव्हादेखील शफाकत  निर्दोष असल्या चे सांगत होता. पण  पोलिसांनी त्याच्यावर अमानूष अत्याचार केले. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला सिगारेटचे चटकेही देण्यात आले होते. शफाकतच्या आईवडिलांसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवी हक्कासाठी लढणा-या संस्थांनीही शफाकतला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. मात्र पाकिस्तानमधील न्यायालयाने शफाकतला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. 

पाकिस्तान सरकारने फाशीवरील बंदी हटवल्यावर बुधवारी शफाकतला फाशीची शिक्षा दिली जाणार होती. शफाकतच्या वतीने त्याच्या वकिलांनी दयेचा अर्ज दिला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. बुधवारी सकाळी शफाकतचा भाऊ जमान तुरुंगात गेला. शफाकतची फाशीची तयारीही पूर्ण झाली, त्याला अंतिम इच्छाही विचारण्यात आली. शफाकतला फाशी देण्यासाठी काही मिनीटांचा अवधी शिल्लक असताना त्याचा दयेचा अर्ज मंजूर झाल्याचे वृत्त तुरुंग प्रशासनाच्या कानावर आले व त्याची फाशी थांबवण्यात आली. पाक सरकारने शफाकतचा अर्ज मंजूर करुन त्याच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती दिली आहे.  गुन्हा घडला त्यावेळी शफाकत अल्पवयीन होता, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा दिली जाऊ शकत नाही असे स्थानिक समाजसेवी संस्थांचे म्हणणे आहे.