शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

आश्चर्य ! दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक

By admin | Updated: September 16, 2016 09:43 IST

रेस्टॉरंटमध्ये दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून चक्क महिलेला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये ही घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 16 - जगभरात अनेक घडामोडी घडत असतात पण ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि हे असंपण असतं का ? हा प्रश्न नक्की पडेल. रेस्टॉरंटमध्ये दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून चक्क महिलेला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये ही घटना घडली आहे. 
 
वॉशिंग्टन डीसीमध्ये रेस्टॉरंटमध्ये एक व्यक्ती शांत बसून फ्राईज खात होता. त्यावेळी ही महिला दारुच्या नशेत तिथे पोहोचली आणि त्याच्या बाजूला बसली. दोघांनी काही वेळ गप्पादेखील मारल्या आणि बोलता बोलता या महिलेने त्याच्या प्लेटमधील फ्राईज उचलल्या. जेव्हा दुस-यांदा तिने फ्राईज उचलण्यासाठी हात पुढे नेला तेव्हा मात्र त्या व्यक्तीने विरोध करत आपण यासाठी पैसे मोजले आहेत आणि तुम्ही ते अशाप्रकारे उचलू शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. विशेष म्हणजे ही व्यक्ती पोलीस अधिकारी होती. 
 
त्याने विरोध केल्याचं पाहून महिलेला राग आला आणि तिने मग मला अटक करुन जेलमध्ये टाका असं सांगितलं. आणि खरंच त्या पोलीस अधिका-याने आपल्या प्लेटमधून तीन फ्राईज चोरल्याच्या आरोपाखाली त्या महिलेला अटक केली. 
ज्या गुन्ह्यासाठी महिलेला अटक करण्यात आली आहे तो गुन्हा तर आपण आपल्या मित्रांसोबत असताना नेहमीच करत असतो. पण या घटनेमुळे ही महिला पुढच्यावेळी कोणाच्या प्लेटमधून काही उचलण्याआधी परवानगी घेईल एवढं मात्र नक्की.