शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सुन्नी बंडखोरांनी जाहीर केले खलिफाचे साम्राज्य

By admin | Updated: July 1, 2014 02:21 IST

बंडखोरांनी ताब्यात असलेल्या प्रदेशात खलिफाचे साम्राज्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. इराक व सिरियात बंडखोरांनी जिंकलेला प्रदेश या साम्राज्यात असेल.

बगदाद : इराकमधील दहशतवादाने सोमवारी वेगळे वळण घेतले असून, अल काईदा या दहशतवादी संघटनेचाच भाग असणा:या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (आयएसआयएस) च्या बंडखोरांनी ताब्यात असलेल्या प्रदेशात खलिफाचे साम्राज्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे. इराक व सिरियात बंडखोरांनी जिंकलेला प्रदेश या साम्राज्यात असेल. आयएसआयएस संघटनेचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा पहिला खलिफा असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे. आपल्या संघटनेचेही नाव त्यांनी बदलले असून ते आता इस्लामिक स्टेट असे आहे. 
सिरियाच्या उत्तरेकडील अलेप्पो ते इराकमधील दियाला प्रांत ही या साम्राज्याची सीमा आहे, असे बीबीसीने म्हटले आहे, तसेच मुस्लिम नागरिकांनी लोकशाहीचा व इतर पाश्चात्त्य कल्पनांचा निषेध करावा आणि नव्या खलिफाचे अल बगदादी याचे नेतृत्व मान्य करावे, असे आवाहनही या संघटनेने केले आहे. सुन्नी बंडखोरांनी ही घोषणा रमजानच्या पहिल्या दिवशी ऑनलाईन केली आहे. 
या ऑनलाईन घोषणोचे रेकॉर्डिग करण्यात आले असून, त्यात आयएसआयएस संघटनेचा प्रवक्ता अबू मोहंमद अल अदनानी याने खलिफांच्या साम्राज्यात इस्लामी कायद्यानुसार निधी उभारणो, 
पुरस्कार, दंड व प्रार्थना असतील, असे सांगितले. 
खलिफांचे साम्राज्य अस्तित्वात आल्यानंतर इतर अमिराती, संघटना, राज्ये, समूह व त्यांचे सैनिक यांचे अस्तित्व राहणार नाही, असे हा प्रवक्ता म्हणाला. (वृत्तसंस्था)