शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सुन्नी बंडखोर बगदादच्या अगदी जवळ

By admin | Updated: June 18, 2014 05:24 IST

इराकची राजधानी बगदादपासून केवळ ६० किमी अंतरावरील बाकबा शहराला मंगळवारी आयएसआयएलच्या सुन्नी कट्टरवाद्यांनी वेढा घातला

बगदाद : इराकची राजधानी बगदादपासून केवळ ६० किमी अंतरावरील बाकबा शहराला मंगळवारी आयएसआयएलच्या सुन्नी कट्टरवाद्यांनी वेढा घातला. इराकी सैन्य आणि कट्टरवाद्यांत गेल्या आठवडाभरापासून इराकच्या पूर्व आणि मध्य भागात भीषण चकमक सुरू आहे. युनोने देशातील हिंसाचारामुळे इराकचे अस्तित्वच धोक्यात असल्याचा इशारा दिला.युनोच्या इराकमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने देशातील हिंसाचारामुळे इराकचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता धोक्यात असल्याचा इशारा दिला. ‘सध्या इराकचे अस्तित्वच धोक्यात असून याचा संपूर्ण प्रदेशावर गंभीर परिणाम होईल. गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठ्या धोक्याचा इराक सामना करत आहे,’ असे हा अधिकारी म्हणाला.दहशतवाद्यांच्या ताब्यातील शहरांवर पुन्हा ताबा मिळवण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू असल्याचा दावा इराकी अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड लवेंट अर्थात आयएसआयएल ही सुन्नी दहशतवादी संघटना आहे. दहशतवाद्यांनी राजधानी बगदाद आणि इराकच्या शियाबहुल भागात घुसण्याची धमकी दिली आहे.हिंसाचारामुळे लाखोंना स्थालांतरित व्हावे लागले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचा देशातील तेल उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)