शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील पहिल्या विद्यत विमानाची यशस्वी झेप

By admin | Updated: May 14, 2014 03:00 IST

जगातील पहिल्या संपूर्णपणे विद्युतशक्तीवर चालणार्‍या विमानाने आकाशात यशस्वी झेप घेतली असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हवाई प्रवासाचे दर एक तृतीयांशपर्यंत खाली येतील, असे हे विमान तयार करणार्‍या एअरबस कंपनीने म्हटले आहे.

लंडन - जगातील पहिल्या संपूर्णपणे विद्युतशक्तीवर चालणार्‍या विमानाने आकाशात यशस्वी झेप घेतली असून, हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे हवाई प्रवासाचे दर एक तृतीयांशपर्यंत खाली येतील, असे हे विमान तयार करणार्‍या एअरबस कंपनीने म्हटले आहे. या विमानाचे नाव इ फॅन असून, प्रायोगिक तत्वावरील या छोट्या विमानाची चाचणी फ्रान्सच्या नैरुत्येकडील (दक्षिण पश्चिम) बोरोडॉक्स विमानतळावर घेण्यात आली. इ फॅनची लांबी १९ आसनाइतकीच असून, त्याचा आवाज अगदी कमी आहे, हेअरड्रायरच्या आवाजापेक्षा तो थोडाच अधिक आहे असे कंपनीने म्हटले आहे. या विमानाला १२० लिथियम आयन पॉलिमर बॅटर्‍या वापरण्यात आल्या असून, या विमानाच्या गेल्या महिन्यात केलेल्या पहिल्या चाचणीत ते दहा मिनिटाइतकाच वेळ आकाशात होते. पण विमान रिचार्ज करण्याआधी ते एकतास आकाशात राहू शकते.

हे विमान पर्यावरणासाठी सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या विमानाचे इंजिन ३० किलोवॅटचे एक तास चालवण्यासाठी या विमानाचा खर्च फक्त १६ अमेरिकन डॉलर आहे. तर सध्याच्या जेट इंधनावर चालणार्‍या विमानांचा ताशी खर्च ५५५ अमेरिकन डॉलर आहे. पण व्यावसायिकरित्या विद्युत विमान किती यशस्वी ठरु शकते हा आज प्रश्न आहे. विमानाच्या बॅटरी पंखात असून, त्यावर ते ४५ ते ६० मिनिटे उडू शकते. रिचार्ज करण्यासाठी एक तासाचा अवधी लागतो. सध्याच्या बॅटरी कितपत सुरक्षित असा प्रश्न विचारण्यात येत असला तरीही एअरबसच्या मते त्या सुरक्षित असल्याची कंपनीला खात्री आहे. इ फॅनच्या बॅटर्‍या संपल्यास बॅकअप बॅटरी मागच्या बाजुला असून, त्यावर विमान १५ मिनिटे तरंगत राहू शकतो.