शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विमान पाडल्याच्या शंकेला बळकटी

By admin | Updated: March 29, 2015 01:38 IST

फ्रान्समधील विमान अपघात सहवैमानिकाने जाणीवपूर्वक घडवून आणल्याच्या शंकेला बळकटी देणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत.

बर्लिन : फ्रान्समधील विमान अपघात सहवैमानिकाने जाणीवपूर्वक घडवून आणल्याच्या शंकेला बळकटी देणाऱ्या बाबी समोर आल्या आहेत. या वैमानिकाने प्रेयसीशी बोलताना ‘एक दिवस माझे नाव सर्वांना माहीत होईल’, असे म्हणून सूचकपणे भावी कृत्याचे संकेत दिले होते तसेच त्याने उड्डयन कंपनी आणि सहकाऱ्यांपासून त्याचा आजारही लपवला होता. या दोन्ही गोष्टी मंगळवारचे विमान कोसळणे हा अपघात नव्हे तर घातपाती कृत्य असल्यास पुष्टी देतात.जर्मन विंग्जचे ए-३२० हे विमान आल्प्स पर्वतराजीत कोसळून १५० प्रवासी ठार झाले होते. कॅप्टन कॉकपिटमधून बाहेर आल्यानंतर सहवैमानिक अँड्रियाज ल्युबित्झने कॉकपिटचे दार आतून लावून घेत विमान ३,००० फूट प्रतिमिनिट एवढ्या वेगाने खाली आणून आल्प्स पर्वतराजीत कोसळवले, असे संकेत कॉकपिट व्हाईस रेकॉर्डरमधील संभाषणातून प्राप्त झाले होते.त्यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांनी दहशतवादाकडे अंगुलीनिर्देश केला होता. त्यानंतर जर्मन पोलिसांनी सहवैमानिक अँड्रियाज ल्युबित्झ याच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्याला कसलातरी आजार असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे फाटलेल्या अवस्थेत आहेत. थोडक्यात, अँड्रियाजने त्याच्या आजारपणाची माहिती विमान कंपनी व आपल्या सहकाऱ्यांपासून दडवून ठेवल्याचे स्पष्ट झाले. (वृत्तसंस्था)जर्मन पोलिसांनी अँड्रियाज याचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्या घराची झडती घेतली होती. मात्र, दुसरीच माहिती समोर आली. (वृत्तसंस्था)४एक दिवस मी असे काही करीन की त्यामुळे संपूर्ण यंत्रणा बदलून जाईल व प्रत्येकाला माझे नाव माहीत होईल, असे अँड्रियाज माझ्याशी बोलताना म्हणाला होता, असे त्याच्या माजी प्रेयसीने सांगितले. ४ अँड्रियाजची माजी प्रेयसी फ्लाईट अटेंडंट असून तिने गेल्यावर्षी पाच महिने अँड्रियाजसोबत काम केले होते. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मला धक्का बसला तसेच अँड्रियाज जे बोलला होता त्याची आठवण झाली, असे तिने सांगितले.