शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अमेरिकेचे लखवीविरोधात सबळ पुरावे

By admin | Updated: March 18, 2015 00:18 IST

२००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटात पाक दहशतवादी झकी-उर-लखवी याचा हात असल्याचे सबळ पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत.

वॉशिंग्टन : २००८ च्या मुंबई बॉम्बस्फोटात पाक दहशतवादी झकी-उर-लखवी याचा हात असल्याचे सबळ पुरावे अमेरिकेने पाकिस्तानला दिले आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याच्या वचनाची आठवण याआधी अमेरिकेने पाकिस्तानला करून दिली असून, त्यानंतर हे पुरावे दिले आहेत. अमेरिकेने पाकला लखवीविरुद्ध सबळ पुरावे दिले आहेत, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. पण हे प्रकरण कायद्याच्या कक्षेत असल्याने त्याने यासंदर्भात काही तपशील दिले नाहीत. अमेरिकेने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात लष्कर-ए- तोईबाचा हस्तक लखवी व इतरांविरोधात पाकला विश्वासार्ह पुरावे दिले आहेत, असे त्याने सांगितले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या चौकशीतून अमेरिकेला ही माहिती मिळाली आहे. मुंबई हल्ल्याप्रकरणी डेव्हिड हेडली आता अमेरिकेत शिक्षा भोगत आहे. अमेरिकेतील अनेक सुरक्षा संस्था व गुप्तचर संघटनांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याची स्वतंत्र चौकशी केली आहे. अमेरिकेने पाकशी दहशतवादविरोधी सहकार्य करण्याचा करार केला असून त्याअंतर्गत कारवाई करण्याचे, तसेच २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपींना शासन करण्याची आठवण करून दिली आहे. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना तसेच आर्थिक मदत करणाऱ्यांना पाकने कायद्याच्या कक्षेत आणण्याचे आश्वासन अमेरिकेला दिले आहे. (वृत्तसंस्था)इस्लामाबाद- पाकिस्तानात दहशतवाद व हत्येचा आरोप असणाऱ्या १२ कैद्यांना एकाच दिवशी फाशी देण्यात आली असून, फाशीच्या शिक्षेवरील सहा वर्षांची बंदी उठल्यानंतर एकाच दिवशी जास्त संख्येने फाशी देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.झांग, कराची, लाहोर, रावळपिंडी, मुलतान, मियावाली, फैसलाबाद, गुरानवाला या तुरुंगात या कैद्यांना फासावर चढविण्यात आले. १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवल्यापासून आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांची संख्या ३९ झाली आहे. पाकिस्तानात पेशावर येथील लष्करी शाळेवर तालिबानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १३२ शाळकरी मुलांसह १५० जणांचा मृत्यू झाल्यानंतर पाक सरकारने १७ डिसेंबर रोजी फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली आहे.४पाकिस्तानात गुन्हेगारी आरोपींना जबरदस्तीने आरोप कबूल करावे लागत असल्याने फाशी अन्याय्य असल्याचे मानवी हक्क संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, पाकिस्तानात एका आरोपीची फाशीची शिक्षा ऐनवेळी लांबणीवर टाकण्यात आली. आरोपीच्या नातेवाईकांनी अखेरच्या क्षणी आरोपी व दावेदार यांच्यातील कराराचे कागदपत्र तुरुंग अधिकाऱ्यांसमोर सादर केले.