शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; इमारती कोसळल्या, चार ठार

By हेमंत बावकर | Updated: October 30, 2020 20:47 IST

Earthquake: प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

तुर्कस्तान आणि ग्रीसच्या सीमेवर शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यामुळे ग्रीसवर त्सुनामीचे संकट असून तुर्कस्तानमध्येही मोठी पडझड झाली आहे. इजमिरमध्ये अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. 

प्राथमिक माहितीनुसार तुर्कस्तानमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तुर्कस्तानचे आरोग्य मंत्री फहार्टिन कोका यांनी सांगितले की, आपल्या चार नागरिकांनी भूकंपामध्ये प्राण गमावले आहेत. तुर्कस्तानच्या किनाऱ्य़ावरील शहर इजमिरमध्ये इमारती कोसळल्या आहेत. इजमिरच्या गव्हर्नरांनी सांगितले की, 70 लोकांना वाचविण्यात आले आहे. 

तुर्कस्तानचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी ट्विटरवर सांगितले की, आतापर्यंत आम्हाला सहा इमारती कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शहरात इमारतींचे नुकसान झाले आहे. यानंतर लगेचच मदत सुरु झाली असून इमारतीमध्ये अडकलेल्या आणि जखमींना उपचारासाठी अनेक पथके कार्यरत झाली आहेत.  ग्रीक मीडियानुसार समोसच्या पूर्वेकडील ईजियन बेटावर छोट्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या होत्या. इमारतींनाही नुकसान झाले आहे. अमेरिकी जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपाचे केंद्र ग्रीसच्या नोन कार्लोवसियन शहराच्या उत्तर-पूर्वेकडे 14 किमी अंतरावर होते.  

टॅग्स :Earthquakeभूकंप