शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दुबईच्या राजकन्येच्या एकांतवासाची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 01:01 IST

श्रीमंत आणि चमचमत्या दुबईचं अख्ख्या जगाला आकर्षण.  या दुबईच्या राज्यकन्येची काय बडदास्त असायला हवी?-  प्रत्यक्षात ही राजकन्या जिवंत आहे ...

श्रीमंत आणि चमचमत्या दुबईचं अख्ख्या जगाला आकर्षण.  या दुबईच्या राज्यकन्येची काय बडदास्त असायला हवी?-  प्रत्यक्षात ही राजकन्या जिवंत आहे की नाही, हेसुद्धा जगाला माहीत नाही! शेख महम्मद बिन रशिद अल मख्तुम हे दुबईचे शासक. त्यांच्या पंचवीस अपत्यांपैकी एक असलेली लतिफा. २०१८ पासून राजकन्या लतिफा बंदीवान आहे.  सध्या तिची काहीच खबरबात नाही.

टीना जॉहिअँनन हिने राजकन्या लतिफाच्या सुटकेसाठी   ‘फ्री लतिफा’ ही मोहीम सुरू केली आहे.  लतिफावरील अत्याचाराची गोष्ट संपूर्ण जगाला कळावी आणि  शेख महम्मद यांच्यावर तिच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय दबाव यावा  यासाठीची ही मोहीम आहे.लतिफाला गाडी चालवायची होती, परदेशात जाऊन शिकायचं होतं; पण तिच्या वाट्याला हे स्वातंत्र्य कधीच येऊ शकलं नाही. टीना जॉहिअँनन ही मूळ फिनलंडची नागरिक. ती लतिफाची फिटनेस ट्रेनर होती.  २०१० ला त्यांची एकमेकींशी ओळख, पुढे गाढ मैत्रीही झाली.  

राजघराण्यात  लतिफावर किती बंधनं आहेत, हे टीनाला समजलं. लतिफाला या तुरुंगातून मुक्त व्हायचं होतं.  लतिफाकडे  पासपोर्ट नव्हता, म्हणून दोघींनी समुद्रमार्गाने पळून जाण्याचं ठरवलं. २४ फेब्रुवारी २०१८ च्या रात्री लतिफा पहारा चुकवून पळाली.  टीना आणि लतिफा रबरी बोटीच्या साहाय्याने ओमान समुद्रापर्यंत पोहोचल्या. तिथून एका नौकेत बसल्या.  भारतीय किनारपट्टीपासून काही किलोमीटर अंतरावर ४ मार्च २०१८ ला  शस्त्रधारी माणसं या नौकेत चढली. त्यांनी  लतिफाला ताब्यात घेतलं.  टीना बोटीतल्या बाथरूममध्ये लपून बसली... टीनानं आपल्या मैत्रिणीला  शेवटचं पाहिलं ते त्या नौकेवर. पुढे लतिफाची रवानगी  भारतीय  लष्करी बोटीत झाली आणि तिथून दुबईला.  टीनालाही दुबईला नेण्यात आलं. दोन आठवडे तिला बंदीवान करण्यात आलं होतं. पुढे तिची सुटका झाल्यावर तिने आपल्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीच्या सुटकेसाठी  ‘फ्री  लतिफा’ ही मोहीम  सुरू केली.

मध्ये कित्येक महिने टीनाचा आणि लतिफाचा काहीच संपर्क नव्हता. पण, २०१९ मध्ये एके दिवशी टीनाला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. काही गुप्त मेसेजेसची देवाणघेवाण झाल्यावर टीना आणि लतिफा एकमेकींशी बोलू शकल्या. लतिफाचा आवाज ऐकल्यावर टीनाला रडूच फुटलं. जीवाला धोका असूनही लतिफाने जवळ एक गुप्त फोन बाळगला होता.  पुढे या फोनवर लतिफा स्वत:चे  काही छुपे  व्हिडीओ बनवून टीना आणि इंग्लंडला असलेल्या आपल्या चुलत भावाला मार्कसला  पाठवू लागली.  सतत कड्या पहाऱ्याखाली असलेली लतिफा  कॅमेऱ्याच्या नजरेशिवाय केवळ बाथरूममध्येच जाऊ शकत होती. तिथे बसून लतिफा हे व्हिडीओ बनवत  असे. 

मार्च २०१८ ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांत लतिफाचा जगाला काहीच पत्ता नव्हता.  टीनानेही  ‘फ्री लतिफा’ ही मोहीम सुरू केली होती. त्यामुळे  संयुक्त राष्ट्रसंघही लतिफाच्या अस्तित्वाचे पुरावे शेख महम्मद यांच्याकडे मागू लागले.  मग, लतिफाची सावत्र आई  राजकुमारी हया पुढे आल्या. लतिफा बायपोलर या मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा आणि त्यामुळे बाहेर ती असुरक्षित असल्याचा बनाव रचला गेला. आणि आपण जे सांगतो आहोत ते खरे आहे हे दाखविण्यासाठी  संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क आयोगाच्या माजी अधिकारी  मेरी रॉबिनसन यांना आमंत्रित केले गेले. या रॉबिनसन हया यांची मैत्रीण.  रॉबिनसन आल्या. लतिफाला  भेटल्या. पण हवा-पाणी, स्काय डायव्हिंग यावरच त्या लतिफाशी बोलल्या. तिची परिस्थिती, तिला काय म्हणायचंय याबाबत काहीही जाणून घेतलं नाही. रॉबिनसन यांनी लतिफासोबत एक फोटो घेतला.  त्यानंतर आठच दिवसांनी शेख महम्मद यांनी तो फोटो जगजाहीर करून लतिफा जिवंत आणि सुखरूप आहे हे जगाला दाखवून दिलं.  प्रत्यक्षात रॉबिनसन यांच्या भेटीनंतर लतिफाचं आयुष्य इंचभरही बदललं नाही. 

एका मोठ्या राजवाड्यात तुरुंगवास आणि एकांतवास  या दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगणाऱ्या लतिफाला अजूनही सुटकेची आस आहे. आपल्या मैत्रिणीनं, भावानं यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्यांनी हार मानायला नको अशी लतिफाची अपेक्षा आहे. लतिफा आपल्या गुप्त फोनमधील व्हिडीओमधून  या अपेक्षा आणि आपलं वास्तव  सतत सांगत असते. पण, टीनाला आणि  मार्कसला हे व्हिडीओ आणि मेसेजेस येणं अचानक बंद झालं आहे.  टीनाला लतिफाविषयी काळजी वाटायला लागली.  पुढे टीना, मार्कस आणि  ‘फ्री लतिफा’चे सहसंस्थापक  यांनी लतिफाने पाठविलेले तिचे खासगी व्हिडीओ जगजाहीर करण्याचं ठरवलं. आज या व्हिडीओंमुळेच  लतिफाबाबत जगाला शंका यायला लागली आहे. लतिफा कुठे आहे, ती सुखरूप आहे ना? असे प्रश्न जग विचारू लागलं आहे

 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय