शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेल्या आय फोनवरील सेल्फी पडली महागात

By admin | Updated: March 29, 2015 14:34 IST

अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला.

ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. २९ - सेल्फी काढण्याचा ट्रेंड सध्या जोमात असून सेल्फी काढण्याच्या मोहापायी आय फोन चोरणा-या तरुणीचे बिंग फुटले. अमेरिकेत एका क्लबमधून आय फोन चोरणा-या १७ वर्षाच्या तरुणीने आय फोनवर सेल्फी काढली पण ते सर्व फोटो आय फोन मालकाच्या फेसबुकवर अपलोड झाले व आय फोन चोरणा-या तरुणीचा चेहरा जगजाहीर झाला. अखेरीस तरुणीच्या आईने हा फोन मुळ मालकाकडे परत केला असून मुलीवर कायदेशीर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. 
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे राहणा-या रॉली बिंगहॅम या २३ वर्षीय तरुणीचा महागडा आयफोन तीन दिवसांपूर्वी चोरीला गेला होता.  रॉली न्यूयॉर्कमधील क्लबमध्ये गेली असता तिथे एका तरुणीने तिला बोलण्यात गुंतवून रॉलीच्या पर्समधील आय फोन लंपास केला. रॉलीला हा सर्व प्रकार समजण्यापूर्वी आय फोन व मोबाईल चोर तरुणी क्लबमधून पसार झाली होती. आता आय फोन कधीच परत मिळणार नाही असे तिला वाटत होते. पण घटनेच्या तीन दिवसांनी लॉरीने फेसबुकवर लॉग इन केले व तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिच्या फेसबुक अकाऊंटवर चोरीला गेलेल्या आयफोनवरुन काढलेले १६ फोटो अपलोड झाले होते. विशेष म्हणजे हे सर्व फोटो म्हणजे मोबाईल चोरणा-या तरुणीने काढलेली सेल्फी होती. तिने या घटनेची माहिती पोलिसांनी दिली व पोलिसांनी मोबाईल चोर तरुणीचा फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पाठवून दिला. मोबाईल चोर तरुणीच्या आईला हा प्रकार समजल्यावर तिने तो फोन स्थानिक पोलिसांना आणून दिला. मोबाईल चोरणारी तरुणी अल्पवयीन असल्याने तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रीया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.