शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युनोच्या हवामान परिषदेस पेरूत प्रारंभ

By admin | Updated: December 1, 2014 23:56 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले

लीमा (पेरू) : संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) हवामान परिषदेसाठी सोमवारी भारतासह १९० देशांचे प्रतिनिधी येथे गोळा झाले असून जागतिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठीच्या नव्या महत्त्वाकांक्षी आणि बंधनकारक करारावर ते वाटाघाटी करणार आहेत. पुढील वर्षी पॅरिसमध्ये स्वीकारण्यात येणाऱ्या या ऐतिहासिक करारावर सर्वसंमती घडवून आणण्याची अखेरची संधी म्हणून या वाटाघाटींकडे पाहिले जाते. कार्बन उत्सर्जन कपातीसाठी गेल्या दोन दशकांपासून वाटाघाटी सुरू आहेत. प्रदूषणांच्या इतर स्रोतांसह कोळसा ज्वलन, तसेच जीवाश्म इंधन वापरण्याच्या घातक परिणामांना आळा घालण्याकरिता युनो आपल्या सदस्य देशांना एकत्रित आणण्याचे अथक प्रयत्न करीत आहे. पेरूच्या राजधानीत १२ दिवस ही परिषद चालणार असून सहभागी प्रतिनिधी २०१५च्या पॅरिस करारासाठी ते कोणते योगदान देणार आहेत याची योजना मांडतील. भारताचे पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे भारताच्या १७ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहेत. हे शिष्टमंडळ लिमात पॅरिसमध्ये होणाऱ्या अंतिम करारातील तरतुदींवर वाटाघाटी करणार आहे. हा करार २०२० मध्ये अमलात आणावयाचा आहे. (वृत्तसंस्था)