शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये संसदेचे विशेष संयुक्त अधिवेशन? ट्रम्प धोरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:50 IST

अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी करत आहे.

इस्लामाबाद : अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आपली पुढील दिशा ठरविण्यासाठी आणि त्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तयारी करत आहे.डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांनी सिनेटमध्ये आपल्या भाषणात संकेत दिले आहेत की, या विषयायवर चर्चेसाठी संयुक्त अधिवेशन बोलविले जाऊ शकते. अमेरिकेची भूमिका एक गंभीर विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कॅबिनेटने मंगळवारी या विषयावर तीन तास विचारविमर्श केला आहे. तर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने (एनएससी) यावर चार तास चर्चा केली आहे. सिनेटचे अध्यक्ष रजा रब्बानी यांनी पंतप्रधानांना सूचित केले आहे की, अमेरिकी अध्यक्षांच्या आक्रमक विधानांनंतर पुढील दिशा ठरविण्यासाठी सिनेट पॅनलची स्थापना करण्यात आली आहे.पाकिस्तानने म्हटले आहे की, पाकिस्तानला दिल्या जाणाºया आर्थिक मदतीबाबत थट्टा करण्यापूर्वी अमेरिकेने याचा विचार करावा की, पाकिस्तानला युद्धात झालेल्या १५० अब्ज डॉलरच्या नुकसानीपैकी काहीच रक्कम त्यांनी दिलेली नाही. सिनेट सदस्यांनी म्हटले आहे की, तत्कालिन लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी अमेरिकेच्या समोर पूर्ण आत्मसमर्पण केल्यानंतर आणि देशात झालेल्या स्फोटामुळे पाकिस्तानातातील शैक्षणिकसंस्था, आरोग्य सुविधा आणि अन्य सुविधांवर याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. (वृत्तसंस्था)पाकने कृती करावी : अमेरिकाव्हाइट हाऊसच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ‘दहशतवाद आणि चर्चा या क्रिया एकाचवेळी होऊ शकत नाहीत’ही भारताची भूमिका आम्ही जाणून आहोत. तथापि, भारतात हल्ले घडवून आणणाºया लष्कर -ए-तोयबा आणि जैश -ए-मोहम्मद यासारख्या अतिरेकी संघटनांवर कडक कारवाई करण्यास पाकला सांगण्यात आले.अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हाती पडू शकतातवॉशिंग्टन : पाकिस्तानचे आण्विक शस्त्रे अतिरेक्यांच्या हाती लागण्याची भीती अमेरिकेने व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या दक्षिण आशियाच्या धोरणात याचा उल्लेख करण्यात आला आहे की, हे आण्विक शस्त्रे चुकीच्या हातात पडायला नकोत. पाकिस्तानकडे आजच्या घडीला १०० पेक्षा जास्त आण्विक शस्त्रे आहेत. तर, २०० ते ३०० आण्विक शस्त्रांची सामग्री त्यांच्याकडे आहे.