शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वतंत्र’ कॅटलोनियावर स्पेनचे नियंत्रण, फुटीरवादी सरकार केले बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 02:43 IST

कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे.

बार्सिलोना : कॅटलोनिया स्वतंत्र झाल्याची घोषणा तेथील नेत्यांनी करताच, स्पेनने त्या संपूर्ण भागावर सरळ नियंत्रण मिळविले असून, फुटीरवादी सरकारला बरखास्त केले आहे. कॅटलोनियाच्या फुटीरवादी संसद सदस्यांनी दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्याची घोषणा मंजूर केली होती. त्यानंतर स्पेन सरकारने हे पाऊल उचलले आहे.पंतप्रधान मारियानो राजोय यांनी संसद बरखास्त करताना २१ डिसेंबर रोजी नव्या निवडणुकांचे आवाहन केले आहे. कॅटलोनियाचे राष्ट्रपती कार्ल्स पुइग्डेमोंट यांच्या जागेवर आता पूर्वोत्तर भागात राजोय हे प्रमुख निर्णय घेणारे नेते बनले आहेत. पुइग्डेमोंट आणि कॅटलोनिया कॅबिनेटच्या १२ सदस्यांना आता वेतन देण्यात येणार नाही. त्यांनी निर्देशांचे पालन करण्यास नकार दिल्यास, त्यांच्यावर दुसºयांचे अधिकार बळकाविण्याचा आरोप लावला जाईल.बरखास्त करण्यात आलेल्या कॅटलोनियाचे पोलीस महासंचालकच आता एकमेव असे अधिकारी आहेत ज्यांनी स्पष्ट केले आहे की, ते आदेशांचे पालन करतील. एकूण १३५ सदस्यीय संसदेत दोनच दिवसांपूर्वी स्वातंत्र्याच्या बाजूने ७० मते पडली होती. विरोधी सिनेटरनी मतदानावर बहिष्कार घातला होता. बार्सिलोनाच्या सिनेट इमारतीच्या बाहेर फुटीरवाद्यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ झेंडे फडकावून आपला आनंद व्यक्त केला होता.काय आहे कॅटलोनिया?कॅटलोनिया हा स्पेनचा अतिशय संपन्न भाग आहे. या भागाचा १००० वर्षांचा इतिहास आहे. स्पेनमधील गृहयुद्धापूर्वी या भागाला स्वायत्तत्ता मिळाली होती. हुकूमशहा जनरल फ्रान्सिस्को फ्रँको यांच्या नेतृत्वात १९३९ ते ७५च्या काळात कॅटलोनियाला स्वायत्तत्ता मिळाली. ती नंतर कमी करण्यात आली. मात्र, फ्रँको यांच्या मृत्यूनंतर कॅटलन राष्ट्रवादाला पुन्हा खतपाणी मिळाले आणि शेवटी उत्तर पूर्व भागात पुन्हा स्वायत्तत्ता द्यावी लागली. सन २००६ च्या कायद्यानुसार कॅटलोनियाला आणखी ताकद देण्यात आली आणि या भागाचा आर्थिक दबदबा वाढू लागला. त्यामुळे त्या भागाला राष्ट्र म्हणून बघितले जाऊ लागले.पण, २०१०मध्ये स्पेनच्या न्यायालयाने कॅटलोनियाचे हे अधिकार परत घेतले. तेव्हापासून येथील स्थानिक प्रशासन नाराज आहे. स्वायत्ततेसाठी येथील नागरिक आक्रमक होऊलागले. त्यामुळे २०१५च्या निवडणुकीत फुटीरवाद्यांना विजय मिळाला होता.