शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अरुणाचलमधील सहा भूभागांचं चीनकडून चिनी नामकरण

By admin | Updated: April 19, 2017 13:37 IST

भारताचा अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर चीननं दावा केला असून, त्या ठिकाणांचं चिनी भाषेत चीनकडून नामकरण करण्यात आलं

ऑनलाइन लोकमतबीजिंग, दि. 19 - दलाई लामांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-याला चीन विरोध करत असतानाच चीननं भारतावर आता कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचा अंग असलेल्या अरुणाचल प्रदेशमधील सहा भागांवर चीननं दावा केला असून, त्या ठिकाणांचं चिनी भाषेत चीनकडून नामकरण करण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांना चीनने अधिकृतरीत्या नावे दिल्याचे वृत्त ग्लोबल टाइम्समधून प्रसिद्धीस देण्यात आलं आहे. चीननं पहिल्यांदाच मानकीकृत अधिकारांनी अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचं नामकरण केलं आहे. चीनच्या मंत्रालयानं 14 एप्रिलला याची घोषणा केली होती. त्यांनी चिनी सरकारच्या नियमांनुसार दक्षिण तिबेट (अरुणाचल प्रदेश)च्या सहा ठिकाणांच्या नावांना चिनी, तिबेट आणि रोमन वर्णांनुसार मानकीकृत केलं आहे. या सहा ठिकाणांचं वोग्यानग्लिंग, मिला री, क्वीडेंगार्बो री, मेन्क्‍युका, बुमो ला आणि नामकापुब री असं रोमन वर्णांनुसार नामकरण केलं आहे. भारत ज्या भूभागाला "अरुणाचल प्रदेश" असे संबोधतो त्या "दक्षिण तिबेट" येथील सहा ठिकाणांना चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रोमन भाषेतील वर्णानुसार नावे दिली आहेत", असे वृत्त चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने दिले आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेशच्या दौ-यामुळे भारत-चीन या देशांमधील सीमाप्रश्‍नावर संबंध कमालीचे ताणले गेल्याचे चीननं म्हटलं आहे. आता पुन्हा अरुणाचल प्रदेशमधील सहा परिसरांचे चीनने नामकरण केल्याचे जाहीर करत हक्क दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारत-चीनदरम्यानच्या 3 हजार 488 किलोमीटरवरील प्रत्यक्ष सीमारेषेवरून दोन्ही देशात वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेशला चीनकडून दक्षिण तिबेट संबोधले जाते. भारतासोबत झालेल्या 1962च्या युद्धात चीन या क्षेत्रावर ताबा मिळवला होता. त्याला सध्या अक्साई चीन असे ओळखले जाते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी चीननं अरुणाचल प्रदेशमधील तवांग देण्याची मागणी केली होती. त्यावेळी पूर्वेकडे भारतानं चीनची काळजी घेतल्यास चीनही त्याच्या मोबदल्यात (अक्साई चीन) इतर भूभाग देण्याचा विचार करेल, असं चीनकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तवांगपासून चीनची सीमा 37 किलोमीटर अंतरावर आहे. तो परिसर बम ला पास नावानेसुद्धा ओळखला जातो.