शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 08:00 IST

इराण युद्धाने गाझा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राधान्यातून मागे पडला आहे

दायर अल-बलाह (गाझा पट्टी : गाझातील युद्धविरामाला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले. गेल्या वर्षी १० ऑक्टोबर रोजी इस्रायल आणि हमासमध्ये युद्धविराम झाला होता. त्यानंतर इस्रायलचे हवाई हल्ले वा अन्य लष्करी कारवायांची संख्या व बॉम्बस्फोटांचे आवाज कमी झाले असला, तरी गाझातील २० लाख नागरिक आजही तंबूंमध्ये आणि उद्ध्वस्त इमारतींमध्ये राहत आहेत. इस्रायलचे अधूनमधून गाझावर हल्ले सुरू आहेत पण इराण युद्धाने गाझा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राधान्यातून मागे पडला आहे.

ट्रम्प यांचे महत्त्वाकांक्षी ‘बोर्ड ऑफ पीस’ रखडले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ अब्ज डॉलर्सच्या निधीसह ‘बोर्ड ऑफ पीस’ स्थापन केला होता. पण इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून या बोर्डाची एकही बैठक झालेली नाही.

  • हमासचे नि:शस्त्रीकरण: हमासने नि:शस्त्रीकरणाच्या प्रस्तावावर अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही.
  • मध्यस्थांचे दुर्लक्ष: कतार व इजिप्त गाझाऐवजी इराण युद्धाला विराम म्हणून वाटाघाटी घडवून आणण्यात व आर्थिक नुकसान सावरण्यात व्यग्र आहेत.

ग्राउंड रिपोर्ट

  • मदतीचा अभाव : मार्चमध्ये गाझात जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकची संख्या ८० टक्क्यांनी घटली आहे.
  • मानवतावादी संकट : २० लाख लोक तंबूंमध्ये राहत आहेत. औषधांचा पुरवठा थांबल्याने रोगराईचा धोका आहे.
  • हिंसाचार : छोट्या चकमकी आणि हल्ल्यांमध्ये गेल्या सहा महिन्यांत ७३८ लोकांचा मृत्यू झाला आहे.

पुढील आव्हाने

  • एकूण जीवितहानी : ७२,३१७ (७ ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत)
  • मदत मार्ग : केवळ एकच सीमा (इस्रायलच्या नियंत्रणाखालील) सुरू.
  • नवा पेच : लेबनॉनमध्ये इंडोनेशियाच्या तीन शांती सैनिकांचा मृत्यू झाल्याने, गाझामध्ये सैन्य पाठवण्यास इतर देश आता कचरत आहेत.
  • येत्या काळात गाझाची पुनर्रचना करणे, हमासचे दोन दशकांचे शासन संपवणे आणि तिथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल तैनात करणे ही सर्वात मोठी आव्हाने असणार आहेत.
  • इराण युद्ध संपेपर्यंत गाझाचे भविष्य अधांतरीच राहणार आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Gaza's Grim Reality: Six Months After the 'Paper' Ceasefire

Web Summary : Despite a six-month ceasefire, Gaza's situation remains dire. Millions live in ruins, aid is scarce, and disease threatens. International focus shifts to Iran, leaving Gaza's future uncertain, with challenges including reconstruction and security.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsraelइस्रायल