शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण करारावर स्वाक्षरी

By admin | Updated: August 31, 2016 04:18 IST

अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या दोन देशांच्या लष्करांमध्ये सैन्य हालचालींबाबत एकमेकांना पाठिंबा मिळेल मात्र लष्करी तळ उभारता येणार नाही

वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारत यांच्यातील संरक्षण करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे या दोन देशांच्या लष्करांमध्ये सैन्य हालचालींबाबत एकमेकांना पाठिंबा मिळेल मात्र लष्करी तळ उभारता येणार नाही, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि अ‍ॅश्टन कार्टर यांनी सांगितले. उभय देशांत लॉजिस्टिक एक्स्चेंज मेमोरंडम आॅफ अ‍ॅग्रिमेंटवर सोमवारी स्वाक्षऱ्या झाल्यानंतर पर्रीकर व कार्टर यांनी ही माहिती दिली. भारतात कोणत्याही प्रकारचा तळ उभारणे किंवा तशा प्रकारचा उपक्रम चालविण्याची तरतूद करारात नाही, असे पर्रीकर म्हणाले.या करारानुसार भारत आणि अमेरिका यांना सैन्याचा पाठिंबा, पुरवठा आणि सेवा पुन्हा मिळविण्याच्या तत्वावर व त्याची अमलबजावणी करण्यास निश्चित कालावधी उपलब्ध होईल. यात अन्न, पाणी, वाहतूक, पेट्रोलियम, तेल, वंगणे, कपडे, वैद्यकीय सेवा, सुटे भाग व घटक, दुरूस्ती, प्रशिक्षण आणि देखरेख सेवेचा अंतर्भाव आहे. शिवाय इतर व्युहारचनात्मक गोष्टी व सेवांचाही समावेश त्यात आहे. एकमेकांच्या विमानांच्या तुकड्यांना व्युहात्मक पाठिंबा देणे, इंधनाचा पुरवठा करणे आदींचा त्यात समावेश असेल. (लोकमत न्यूज नेटवर्क) भारताची अमेरिकेसोबतची आघाडी ही चीन,पाकिस्तान एवढेच काय रशियालाही खिजवू शकते व भारत अशियात भूराजकीय शत्रुत्वाचे केंद्र बनून स्वत:ला सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने ‘त्रास’ करून घेत आहे, असे मतचीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने व्यक्त केले.भारत अमेरिकेच्या बाजुने झुकल्यास तो स्वत:चे व्यूहरचनात्मक स्वातंत्र्य गमावून बसेल. अमेरिकेतील प्रसार माध्यमांनी मात्र या कराराचे स्वागतही केले.