शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या 333 देवमाशांची कत्तल

By admin | Updated: March 31, 2017 18:03 IST

जपानच्या वैज्ञानिकांनी संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या तब्बल 333 देवमाशांची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.

ऑनलाइन लोकमतजपान, दि. 31 - जपानच्या वैज्ञानिकांनी संशोधनाच्या नावाखाली मिंक जातीच्या तब्बल 333 देवमाशांची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. अंक्टार्टिक महासागरातून 333 मृत व्हेल माशांनी भरलेली तीन जहाजं जपानच्या बंदरावर परत आली आहेत. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. संशोधनाच्या नावाखाली या देवमाशांची कत्तल करण्यात आली आहे, असं कारण जपाननं पुढे केलं आहे. जगातील देवमाशांची शिकार करून त्यांच्यावर प्रक्रिया करण्याचा एकमेव कारखाना फक्त जपानमध्ये आहे. या देवमाशांना मारण्यासाठी जपानकडून चार महिन्यांची मोहीमही राबवण्यात आली होती. तसेच देवमाशांच्या मांसाला जपानच्या बाजारात मोठी मागणी असल्यानं त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. शाळेतील मुलांच्या जेवणावळीत या देवमाशांच्या मांस दिलं जात असल्याचंही समोर आलं आहे. जपानवर व्यावसायिक कारणांसाठी देवमाशांची कत्तल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून 1986ला बंदी घालण्यात आली होती. मात्र वैज्ञानिकांच्या संशोधनाच्या नावाखाली बंदी झुगारून या देवमाशांची कत्तल केली आहे. संयुक्त राष्ट्रात 2015मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं जपानवर देवमाशांची शिकार करण्यात पूर्णतः बंदी घातली होती. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत जपाननं पुन्हा देवमाशांची कत्तल केली आहे. मात्र मिंक जातीच्या देवमाशांची एवढ्या मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्यानं पर्यावरणवाद्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.