शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना काहीही वाकडे करू शकत नाही, ओम पुरींनी आता शिवसेनेला डिवचले

By admin | Updated: October 6, 2016 15:03 IST

'शिवसेनेकडे आरडीएक्स नाही आणि एके 47 सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते काहीही वाकडे करू शकत नाही', असे म्हणत ओम पुरी आता शिवसेनेवर घसरले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.6 - उरी हल्ल्यातील शहीद जवानांचा अपमान केल्यामुळे ओम पुरींविरोधात देशभरातून हल्लाबोल सुरू आहे. हा वाद शमलेला नसतानाच, ओम पुरी यांनी शिवसेनेविरोधात टीका करत पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीसंदर्भात पाकिस्तानी चॅनेलने ओम पुरी यांची फोनवरुन प्रतिक्रिया घेतली. यावेळी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करत, त्यांच्या विरोधात असणा-या शिवसेनेला त्यांनी डिवचले आहे. 'शिवसेनेकडे आरडीएक्स नाही आणि एके 47 सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते काहीही वाकडे करू शकत नाही', असे म्हणत ओम पुरी आता शिवसेनेवर घसरले आहेत. 
 
आणखी बातम्या
 
'पाकिस्तानी कलाकार वैध व्हिसाद्वारे भारतात येतात, त्यामुळे त्यांना घाबरण्याचे कारण नाही,  वैध व्हिसा असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना सुरक्षा पुरवू, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुणीही पाकिस्तानी कलाकारांवर हल्ला करू शकणार नाहीत', असे देखील ओम पुरी म्हणाले आहेत. ओम पुरी यांनी शिवसेनेसंदर्भात केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओम पुरींवर शिवसेना कशा पद्धतीने शाब्दिक बाण सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.