शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:46 IST

Sheikh Hasina News: शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे. 

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान वकिलांनी रविवारी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. २०२४ साली बांगलादेशमध्ये पेटलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक कारवाईमधील त्यांच्या भूमिकेवरून शेख हसिना यांच्याविरोधात हे आरोप करण्यात आले आहेत.

शेख हसिना यांनी स्वत: सरकारी सुरक्षा यंत्रणा, आपला पक्ष आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांना थेट आदेश दिले. त्यामुळे या आंदोलनादरम्यान, मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला, असा दावा एका तपास अहवालामधून करण्यात आला आहे. 

बांगलादेशमधील देशांतर्गत आंतरराष्ट्रीय क्राईम ट्रिब्युनलचे चीफ प्रॉसिक्युटर मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी रविवारी सांगितले की, या हत्या पूर्वनियोजित होत्या. त्यांनी व्हिडीओ पुरावे आणि विविध एजन्सींदरम्यान झालेल्या एन्क्रिप्टेड संभाषणांचा हवाला देत हा दावा केला. त्यांनी पुढे सांगितले की, पुराव्यांचा केलेल्या सखोल तपासानंतर हा एक संघटित, व्यापक आणि सूनियोजित हल्ला होता, या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत. शेख हसिना यांनी आंदोलनाला चिरडण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा आणि आपल्या पक्षाच्या हत्यारबंद कार्यकर्त्यांना मोकळं सोडलं होतं., असा दावाही त्यांनी केला.

सरकारच्या प्रमुख म्हणून सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईची पूर्ण जबाबदारी ही शेख हसिना यांची आहे, असेही चीफ प्रॉसिक्युटर मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी पुढे सांगितले. 

टॅग्स :BangladeshबांगलादेशCourtन्यायालय