शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

शरीफ यांच्या कबुलीने पाकचा झाला जळफळाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 6:39 AM

मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी कबुली माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिल्याने मुखभंग झालेल्या पाकिस्तानचा जळफळाट झाला.

इस्लामाबाद : मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला पाकिस्तानध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनीच घडवून आणला, अशी कबुली माजी पंतप्रधान मोहम्मद नवाज शरीफ यांनी दिल्याने मुखभंग झालेल्या पाकिस्तानचा जळफळाट झाला. सरकार व लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘राष्ट्रीय सुरक्षा समिती’ची तातडीने बैठक घेत शरीफ यांना खोटे पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र स्वत: शरीफ यांनी आपण सत्य तेच बोललो व यापुढेही परिणामांची तमा न बाळगता सत्याला वाचा फोडतच राहीन,असे ठामपणे सांगितले.समितीच्या बैठकीनंतर शरीफ यांनी केलेली विधाने चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत, असा दावा करणारे एक निवेदन प्रसिद्ध केले गेले. त्यात म्हटले गेले की, पदच्युत केलेल्या शरीफ यांनी ठोस पुरावे व वस्तुस्थिती दुलर्क्षित करून अशी वकत्व्ये करावीत हे दुदैर्वी आणि खेदजनक आहे.मुंबईवर हल्ला करणाºयांना पाकिस्तान पाठीशी घालत असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करून शरीफ यांनी यासंबंधीचा पाकिस्तानमधील खटला १० वर्षे का रेंगाळला आहे, असा सवाल केला होता. याचा संदर्भ देत समितीच्या निवेदनात खटला रेगाळण्याचे खापर भारताच्या माथी फोडण्यात आले. समितीच्या म्हणण्यानुसार भारताने अनेक प्रकारे नकार दिल्याने तपासात अडथळे तर आलेच, शिवाय मुख्य आरोपी अजमल कसाबचे जबाब घेण्याची संधी न देता घाईने त्याला फासावर लटकविल्याने खटल्याची पूर्तता होऊ शकली नाही.‘डॉन’ वृत्तपत्राने शरीफ यांची वक्तव्ये संदर्भ सोडून चुकीची प्रसिद्ध केली, असे भासविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सोमवारी भ्रष्टाचारविरोधी न्यायालयातील खटल्यासाठी आले असता स्वत: शरीफ यांनी आपण जे बोललो तेच प्रसिद्ध झाले आहे, असे स्पष्ट केले. मी सत्य तेच बोललो व यापुढेही परिणामांची तमा न बाळगता सत्य बोलतच राहीन, असे ते ठामपणे म्हणाले. मी जे बोललो तेच याआधी माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ, माजी गृहमंत्री रहमान मलिक, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) मेहमूद दुर्रानी यांनीही सांगितले आहे. मला खोटे पाडून माध्यमांकरवी मला देशद्रोही ठरविण्याचा खटाटोप केला जात आहे. बोलतो म्हणून मी राष्ट्रद्रोही असेन तर देशाचे तुकडे पाडणारे, राज्यघटनेची लक्तरे करणाºयांना काय देशप्रेमी म्हणायचे? असा सवालही शरीफ यांनी उपस्थित केला.>स्वत:चा पक्ष आणि भावानेही हात झटकलेसर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविल्याने नवाज शरीफ सत्तेतून गेले असले तरी त्यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज हा पक्ष अजूनही सत्तेवर आहे. शक्तिशाली आणि सक्रिय लष्कराची नाराजी ओढवून घेणे कोणत्याही सत्ताधारी पक्षाला परवडणारे नसल्याने पक्षाने व पक्षाचे अध्यक्ष असलेले शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांनी शरीफ यांनी केलेली वक्तव्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणेही अमान्य असल्याचे सांगून हात झटकले.

टॅग्स :Nawaz Sharifनवाज शरीफPakistanपाकिस्तान