शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

शाहरुखने पाकिस्तानमध्ये यावे - हाफिज सईद

By admin | Updated: November 4, 2015 12:09 IST

भारतात भेदभाव आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागणा-या शाहरुख खानने पाकिस्तानमध्ये येऊन राहावे, असे सांगत हाफिजने शाहरुखला पाकमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले आहे.

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. ४ -  शाहरुख खान राष्ट्रविरोधी असल्याची मुक्ताफळं भाजपा नेते विजयवर्गीय यांनी उधळल्याने वाद निर्माण झाला असतानाच पाकिस्तानमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदनेही या वादात उडी घेतली आहे. भारतात भेदभाव आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागणा-या शाहरुख खानने पाकिस्तानमध्ये येऊन राहावे, असे सांगत हाफिजने शाहरुखला पाकमध्ये येण्याचे निमंत्रणच दिले आहे. 

देशात असहिष्णूता वाढल्याचे विधान शाहरुख खानने सोमवारी केले होते. शाहरुखच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांची जीभ घसरली आणि नवा वाद निर्माण झाला. विजयवर्गीय यांनी शाहरुख राष्ट्रविरोधी असल्याचे म्हटले असून विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनीदेखील शाहरुख पाकिस्तानचा एजट असल्याचे बेताल विधान केले आहे. शाहरुखवर टीका सुरु होताच पाकिस्तानमध्ये बसलेल्या हाफिज सईदने शाहरुखच्या समर्थनार्थ टिवटिवाट केला आहे. 

'भारतात राहणा-या विचारवंतांनी हिंदूत्ववाद्यांच्या असहिष्णूतेविरोधात आवाज उठवला यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. ही मंडळी कधी पाकमध्ये आली तर त्यांना जमात उद दावाच्या शिबीरांमध्ये अल्पसंख्यांकासाठी चालवल्या जाणा-या योजना दाखवू. भारतात क्रीडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मुस्लिमांना अजूनही स्वतःची ओळख जपण्यासाठी झगडावे लागते. शाहरुख असो किंवा अन्य कोणताही मुसलमान ज्यांना भेदभावाचा फटका बसतोय त्यांनी पाकिस्तामध्ये येऊन राहावे असे सईदने म्हटले आहे.