शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सेरेनाने शारापोवाला मागे टाकले

By admin | Updated: June 8, 2016 04:36 IST

ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली

लॉस एंजेलिस : यंदाच्या मोसमात अनपेक्षितपणे सलग दोन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने कमाईच्या बाबतीत मात्र जबरदस्त आघाडी मिळवली आहे. या वेळी तिने तब्बल ११ वर्षे कमाईच्या बाबतीत अग्रस्थान राखलेल्या रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोवाला मागे टाकत अव्वल स्थानी झेप घेतली. एका नामांकित मॅगझीनने दिलेल्या माहितीनुसार सेरेनाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. या वेळी तिने एकेकाळी याबाबतीत अग्रस्थान राखलेल्या आणि सध्या डोपिंगमुळे अनिश्चित काळासाठी बंदीला सामोरी गेलेल्या मारिया शारापोवाला पिछाडीवर टाकले. अमेरिकेची मिक्स मार्शल आर्ट खेळाडू रोंडा रोसी हिने जबरदसत मुसंडी मारताना १.४ कोटी डॉलरच्या कमाईसह आठव्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी कब्जा केला. तर तिच्यानंतर नास्कार ड्रायव्हर डॅनिका पैट्रीक (१.३० कोटी डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे अव्वल १० खेळाडूंमध्ये टेनिसपटूंचा अधिक समावेश आहे.(वृत्तसंस्था) >गेल्या १२ महिन्यांत सेरेनाने खेळाच्या माध्यमातून आणि त्याव्यतिरिक्त सुमारे २.८९ कोटी डॉलरची कमाई केली आहे. शारापोवा कमाईच्या बाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून अव्वल स्थानी कायम होती. मात्र डोपिंगमध्ये नाव आल्यापासून तिच्या कमाईमध्ये कमालीची घसरण झाली. तरीदेखील ती २.१९ कोटी डॉलरच्या कमाईसह द्वितीय स्थानी आहे. पोलंडची एग्निज्स्का रदवांस्का (१.०२ कोटी) पाचव्या, डेन्मार्कची कॅरोलिन वोज्नियाका (८० लाख), फ्रेंच ओपन विजेती स्पेनची गरबाइन मुगुरुजा (७६ लाख), सर्बियाची अ‍ॅना इवानोविच (७४ लाख), बेलारुसची व्हिक्टोरिया अजारेंका (६६ लाख) आणि कॅनडाची युजिनी बुकार्ड ((६२ लाख) यांचा समावेश आहे.