शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

भिन्न पितृत्वाची जुळी मुले!

By admin | Updated: March 9, 2016 06:00 IST

व्हिएतनाममध्ये एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून जुळी मुले झाली असल्याची वस्तुस्थिती वैज्ञानिक चाचणीनंतर समोर आली आहे.

हनॉई (व्हिएतनाम): व्हिएतनाममध्ये एका महिलेला दोन वेगवेगळ्या पुरुषांपासून जुळी मुले झाली असल्याची वस्तुस्थिती वैज्ञानिक चाचणीनंतर समोर आली आहे. अशी घटना विरळी असली, तरी वैज्ञानिकदृष्ट्या ती अघटित मात्र नाही, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.ही जुळी मुले आता दोन वर्षांची आहेत. जन्मापासूनच रंगरूपाने वेगळ््या दिसणाऱ्या या मुलांमधील भिन्नता दिवसेंदिवस वाढत गेल्यावर कुटुंबात उलटसुलट चर्चा सुरू झाली. मुले जुळी आहेत हे खरे, पण त्यातील एक मूल कदाचित प्रसूतिगृहात जन्माच्या वेळी बदलले गेले असावे, अशी शंकाही उपस्थित झाली. यातून निर्माण झालेला ताणतणाव असह्य झाल्यावर सोक्षमोक्ष करून घेण्यासाठी हे दाम्पत्य त्यांच्या जुळ््या मुलांना घेऊन राजधानी हनॉईमधील ‘सेंटर फॉर जेनेटिक अ‍ॅनेलिसिस अँड टेक्नॉलॉजिस’मध्ये घेऊन आले. तेथे माता-पिता व दोन्ही जुळ््या मुलांच्या ‘डीएनए’ चाचण्या करण्यात आल्या. त्यातून या जुळ््यांची आई एकच असली, तरी बाप मात्र वेगवेगळे असल्याचा निष्कर्ष निघाला.व्हिएतनाम जेनेटिक असोसिएशनचे अध्यक्ष ले दिन्ह लुआँग यांनी सांगितले की, प्रयोगशाळेच्या निष्कर्षाने त्या जुळ््या मुलांच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. आता या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा, यावर ते विचार करीत आहेत.सरकारी व्हिएतनाम न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, हे अजब जुळे जन्माला आलेले कुटुंब देशाच्या उत्तरेकडील होआ बिन्ह प्रांतातील आहे. या दाम्पत्यातील ३५ वर्षांचा पती हा या दोन जुळ््यांपैकी फक्त एकाचाच जैविक पिता असल्याचे सिद्ध झाले आहे. या जुळ्यांपैकी एका मुलाचे केस दाट व कुरळे, तर दुसऱ्याचे विरळ व सरळ आहेत.डीएनए चाचणी करताना गोपनीयता पाळण्याची हमी देण्यात आल्याचे कारण देऊन वृत्तसंस्थेने या प्रकरणी अधिक तपशील दिलेला नाही.गेल्या वर्षी अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात एका न्यायालयीन प्रकरणात अशा भिन्न पितृत्वाच्या जुळयांची माहिती उघड झाली होती. एका अविवाहित महिलेला जुळ््या मुली झाल्या. त्या ज्याच्यापासून झाल्या अशी त्या महिलेची धारणा होती, त्याने वाऱ्यावर सोडून दिले, म्हणून तिने त्याला उदरनिर्वाहाच्या खर्चासाठी कोर्टात खेचले. त्याने पितृत्व नाकारले, तेव्हा न्यायालयाने डीएनए चाचणी करण्याचा आदेश दिला. त्यातून जुळ््या मुलींपैकी फक्त एकीचाच तो जैविक पिता असल्याचे निष्पन्न झाले व न्यायालयाने फक्त त्याच मुलीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. (वृत्तसंस्था)अशा जुळ््यांचेप्रमाण अनिश्चितअशी भिन्न पितृत्वाची जुळी जन्माला येण्याचे प्रमाण बहुधा ४००मध्ये एक असावे, असे वैद्यकीय अभ्यासक मानतात. अशी नेमकी किती जुळी जन्माला येतात, याची मोजदाद ठेवणे कठीण आहे. कारण प्रत्येक जुळी मुले हुबेहूब एकमेकांसारखी दिसणारी असतातच असे नाही व हुबेहूब न दिसणाऱ्या जुळ््यांचा पिता वेगळा असेल असेही नाही. फक्त डीएनए चाचणी केली, तरच भिन्न पितृत्व सिद्ध होते व प्रत्येक वेळी अशी चाचणी केली जातेच असे नाही.> असे कसे होऊ शकते?दर महिन्याला स्त्रीच्या बिजांडकोषातील सर्वसाधारणपणे एक स्त्रीबीजपरिपक्व होऊन फेलोपियन नलिकेच्या मार्गे गर्भाशयात येते.गर्भाशयात हे स्त्रीबीज पाच ते सात दिवस ‘जिवंत’ राहते. या काळात शरीरसंबंधांतून पुरुषाच्या शुक्राणूचा स्त्रीबिजाशी संयोग झाल्यासगर्भधारणा होते.अपवाद म्हणून काही वेळा एका वेळी एकऐवजी दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात येतात. एकाच वेळी किंवा निरनिराळ््या वेळी केलेल्याशरीरसंबंधांतून ही दोन्ही स्त्रीबिजे फलित झाली, तर दोन गर्भ तयार होतात व जुळी मुले जन्माला येतात.दोन परिपक्व स्त्रीबिजे गर्भाशयात ‘जिवंत’ असण्याच्या काळात दोन भिन्न पुरुषांच्या शुक्राणूंनी फलित झाल्यास, तयार होणारे दोन गर्भ व जन्माला येणारी जुळी मुले भिन्न पितृत्वाची होतात.माणसांच्या बाबतीत विरळी घडणारी ही घटना कुत्र्यांच्या बाबतीत सर्रास घडते. म्हणूनच कुत्रीला होणाऱ्या अनेक पिल्लांपैकी काही पिल्ले पांढरी, काही काळी, काही करडी तर काही अंगावर एकाहून अनेक रंगांचे ठिपके असलेली असतात.