शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महिला नौसैनिकांच्या न्यूड फोटोंमुळे खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 15:13 IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो, व्हीडिओ शेअर करणयाच्या प्रवृत्तीही बळावल्या आहेत. आता तर महिला सैनिकही या विकृतीच्या शिकार

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 6 - इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत सायबर क्राइमचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांचे अश्लील फोटो, व्हीडिओ शेअर करणयाच्या प्रवृत्तीही बळावल्या आहेत. आता तर महिला सैनिकही या विकृतीच्या शिकार झाल्या असून, अमेरिकन नौसेनेतील महिला सैनिकांचे अश्लील फोटो फेसबूक ग्रुपवर शेअर केल्या प्रकरणी शेकडो पुरुष नौसैनिकांची चौकशी सुरू आहे. 
या संदर्भातील वृत्त डेली मेल या वृत्तपत्रात प्रकाशित झाले असून, या वृत्तानुसार 'सेंटर फॉर इन्वेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग ऑफ द वॉर हाऊस'च्या अहवालातून हा प्रकार उघडकीस आला आहे.  मरिन्स युनायटेड नावाच्या सिक्रेट ग्रुपमध्ये अशा प्रकारची हजारो छायाचित्रे प्रसारित केली जात असून, त्यात सध्या नौदलात सेवेमध्ये असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. या ग्रुपमध्ये 30 हजारहून अधिक फॉलोअर्स असून, त्यातून पीडितांवर उत्तेजक आणि अश्लील शेरेबाजी केली जात असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, यातील दोन डझनहून अधिक पीडित महिलांची ओळख पटली आहे. या अश्लील ग्रुपचे सदस्य असलेल्या व्यक्तीच नव्या सदस्यांना समाविष्ट करू शकतात. तसेच हा ग्रुप केवळ आजी आणि माजी सदस्यांनाच सर्च करता येतो.  दरम्यान, हा ग्रुप चालवत असलेल्या व्यक्ती हा ग्रुप मुव्ह करत राहतात. त्यामुळे त्याच्या स्कोपचा शोध घेणे अवघड झाले आहे, असे अमेरिकेच्या नौदलाचे जनसंपर्क अधिकाऱी कॅप्टन रेयान एल्विस यांनी सांगितले.