शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

डेटींगसाईटच्या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री

By admin | Updated: April 27, 2016 13:04 IST

विवाह, प्रेमसंबंध जुळवणारी डेटिंग वेबसाईट ब्युटीफुल पीपलवरील डाटाची चोरी झाली आहे. या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत 

लंडन, दि. २७ - विवाह, प्रेमसंबंध जुळवणारी डेटिंग वेबसाईट ब्युटीफुल पीपलवरील डाटाची चोरी झाली आहे. या डाटाची चोरी करुन ऑनलाइन विक्री करण्यात आली. चोरी झालेल्या डाटामध्ये ब्युटीफुल पीपलवर नोंदणी करणा-या लाखो सदस्यांची खासगी माहिती आहे. सदस्यांची वजन, उंची, नोकरी आणि फोन नंबरच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे. 
 
जुलै २०१५ पूर्वी नोंदणी करणा-यांच्या माहितीची चोरी झाल्याचे ब्युटीफुल पीपलने सांगितले. ज्या डाटाची चोरी झाली त्यामध्ये पासवर्ड किंवा आर्थिक माहिती नव्हती.  डाटा चोरी झाल्याचे संगणक सुरक्षा तज्ञ ख्रिस विकरे यांच्या लक्षात येताच त्यांनी ब्युटीफुल पीपलला माहिती दिली. कंपनीनेही तात्काळ पावले उचलली पण तो पर्यंत उशीर झाला होता. डाटाची ऑनलाइन विक्री झालेली होती. टेस्ट सर्व्हरमधून या डाटाची चोरी करण्यात आली. 
 
ब्युटीफुल पीपलवर अशी नोंदणी होते
ब्युटीफुल पीपलचे सदस्यत्व मिळवण्यासाठी वापरकर्त्याला त्याचे फोटो संकेतस्थळाला पाठवावे लागतात. त्या फोटोंवर व्होटींग होते. ठरवलेल्या मानकानुसार दोन दिवसात पुरेशी मते मिळाली तर, त्याला ब्युटीफुल पीपलचे सदस्यत्व मिळते.