शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरितांच्या मौल्यवान वस्तू डेन्मार्क जप्त करणार

By admin | Updated: January 28, 2016 01:22 IST

देश सोडून वर्ष होत आले तरी सीरियन स्थलांतरितांच्या हाल- अपेष्टांमध्ये कोणतीही घट होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास

कोपनहेगन : देश सोडून वर्ष होत आले तरी सीरियन स्थलांतरितांच्या हाल- अपेष्टांमध्ये कोणतीही घट होण्याची अद्याप चिन्हे नाहीत. सीरियन स्थलांतरितांच्या सर्व मौल्यवान वस्तू ताब्यात घेण्यास संमती देणारे वादग्रस्त विधेयक डेन्मार्कच्या संसदेने मंजूर केले आहे. यानुसार स्थलांतरितांकडून दहा हजार क्रोनरपेक्षा (१३४० युरो, १००० पौंड) जास्त असणारी संपत्ती पोलिसांना ताब्यात घेता येणार आहे.गेल्या वर्षात डेन्मार्कमध्ये २१,००० स्थलांतरितांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थलांतरितांच्या लोंढ्याचा अर्थव्यवस्थेवर संभाव्य परिणाम रोखण्यासाठी डेन्मार्कने हे पाऊल उचलले आहे. डेन्मार्कच्या संसदेत ८१ विरुद्ध २७ अशा मतांनी यास मंजूरी मिळाली. या कायद्यानुसार लग्नाची, साखरपुड्याची अंगठी, चित्रे, सजावटीच्या वस्तू, बक्षीस-पदके स्थलांतरितांना आपल्या जवळ बाळगता येणार आहेत मात्र घड्याळ, मोबाइल, कॉम्प्यूटर्स जप्त केले जाऊ शकतात. स्थलांतरिताचा आमच्या देशावर येणारा ताण भरुन काढण्यासाठी हे पाऊल उचलावे लागत असल्याचे डेन्मार्कने म्हटले आहे. डेन्मार्क संसदेच्या या कृतीवर जगभरातून टीका होत असून युनोचे सरचिटणीस बान की मून यांनीही डेन्मार्कचा निषेध केला आहे. काही टीकाकारांनी या कायद्याची दुसऱ्या महायुद्धात युरोपात ज्यू लोकांवर ओढावलेल्या परिस्थितीशी केली आहे. डेन्मार्कवर आता टीका होत असली तरी असे करणारा तो पहिला देश नाही. (वृत्तसंस्था)जर्मनी देणार रोजगार- सीरियन स्थलांतरित गेल्या दोन वर्षात सर्वाधिक संख्येने जर्मनीमध्ये पोहोचले आहेत. त्यांना तात्पुरते रोजगार देण्याची सोय जर्मनीने केली आहे. यानुसार मध्यपूर्वेत अडकलेल्या सीरियन तसेच जॉर्डनच्या नागरिकांनाही रोजगार उपलब्ध होणार आहेत. पाच लाख रोजगारांसाठी २०० दशलक्ष युरोंची तरतूद जर्मनी करणार असून प्रतिमहिना ३०० युरो प्रत्येकास मिळतील अशी तरतूद करण्यात येत आहे.स्वीत्झर्लंडने स्थलांतरितांकडून याआधीच पैसे काढून घेतलेले आहेत.११२ स्थलांतरितांकडून२,१०,००० स्वीस फॅ्रंक्स त्यांनी गोळा केलेले आहेत तर नेदरलँडसने प्रतिव्यक्ती ५,८९५ युरो व प्रति कुटुंब ११,७९० युरो खर्चापोटी वसूल केलेले आहेत.