शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार शोधला

By admin | Updated: August 29, 2016 06:36 IST

स्तनाच्या कर्करोगावरील (ब्रेस्ट कॅन्सर) उपचार शोधल्याचा दावा भारतीय वंशाच्या इंग्लडमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या के. नित्यानंदम याने केला आहे

लंडन : स्तनाच्या कर्करोगावरील (ब्रेस्ट कॅन्सर) उपचार शोधल्याचा दावा भारतीय वंशाच्या इंग्लडमध्ये राहणाऱ्या १६ वर्षांच्या के. नित्यानंदम याने केला आहे. स्तनाचा कर्करोग हा औषधांना जुमानत नाही, अशी या रोगाची कुख्याती आहे.के. नित्यानंदम हा त्याच्या पालकांसोबत भारतातून इंग्लडमध्ये आला. स्तनाचा ट्रिपल निगेटिव्ह कर्करोग औषधांना प्रतिसाद देईल, असा मार्ग मी शोधला आहे, अशी त्याची आशा आहे. अनेक स्तनाचे कर्करोग हे ओएस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन किंवा रसायनांची वाढ यामुळे पुढे सरकतात. टॅमोक्सिफेन यासारख्या औषधांमुळे त्यांचा मार्ग रोखला जाऊन प्रभावी उपचार होऊ शकतो, असे त्याचे म्हणणे आहे. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरला असा कोणताही अवयव किंवा पेशी नाही, त्यामुळे त्यावरचा एकमेव उपाय म्हणजे, शस्त्रक्रिया, किरणोत्सर्ग आणि केमोथेरपी यांचा संयोग. या उपचाराने रुग्ण वाचण्याची शक्यता कमी होते. उपचार करण्यास अवघड असलेले कर्करोग उपचारांना प्रतिसाद देतील, असे त्यांचे स्वरूप करण्याचा मी मूलभूतपणे प्रयत्न करीत आहे, असे नित्यानंदम म्हणाले. (वृत्तसंस्था)बहुतेक कर्करोगांना त्यांच्या पृष्ठभागावर अवयव किंवा पेशी असतात व ते टॅमोक्सिफेमसारखी औषधे स्वीकारतात, परंतु ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सरला असे रिसेप्टर्स नसल्यामुळे औषधे काम करीत नाहीत, असे नित्यानंदम म्हणाल्याचे वृत्त ‘द संडे टेलिग्राफ’ने दिले आहे.भारतात स्तनाचा कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ मुंबईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार एकूण कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्तनाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास ३० टक्के होते़ याशिवाय स्तनाचा कर्करोग होण्याचे वयही कमी होत असून, पंचवीस वर्षांपूर्वी हा रोग सरासरी ३३ व्या वर्षी आढळत होता़ आता ह्या रोगाचे निदान होण्याचे वय २२ वर आले आहे.