संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद शांतता आणि सुरक्षेसमोरील नव्या आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे, असे सांगून भारताने ७० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेमध्ये सुधारणवर जोर दिला. संयुक्त राष्ट्राचा ७० वा वर्धापनदिन हे ऐतिहासिक निष्पत्तीसाठी उपयुक्त असे ऐतिहासिक औचित्य आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्र आमसभेला गुरुवारी संबोधित करताना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, संघर्ष थांबविणे, जगाला शांततेचा मार्ग दाखविण्यातही संयुक्त राष्ट्राला यश आलेले नाही. (वृत्तसंस्था)
सुरक्षा परिषद अपयशी -भारत
By admin | Updated: October 2, 2015 23:38 IST