शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एच-१ बी व्हिसावर सिनेटर्सचे टीकास्त्र

By admin | Updated: February 27, 2016 01:55 IST

येथे लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात

वॉशिंग्टन : येथे लोकप्रिय असलेल्या एच-१ बी व्हिसा कार्यक्रमावर वरिष्ठ अमेरिकी सिनेटर्सनी टीका केली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांना काढून भारतासह अन्य देशांचे कर्मचारी कमी वेतनात ठेवण्यासाठी या व्हिसाचा दुरुपयोग करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.यासंदर्भातील समितीचे प्रमुख सिनेटर जेफ सेशन्स म्हणाले की, अमेरिकेत कुशल कामगारांची टंचाई आहे, ही खेदाची बाब आहे. अमेरिकेत अमेरिकी कर्मचाऱ्यांना कमी करून त्यांच्या जागेवर परदेशातील कर्मचारी ठेवले जात आहेत, ही धक्कादायक बाब आहे. अमेरिकेत कुशल कर्मचाऱ्यांची वानवा असल्याचा आरोप अनेक कंपन्या करीत असतात. त्यांचा हा आरोप फेटाळून लावताना जेफ सेशन्स म्हणाले की, कमी वेतनात परदेशी कर्मचारी ठेवण्यासाठी कंपन्यांतर्फे हा दावा केला जात आहे. कुशल अमेरिकन कर्मचाऱ्यांची टंचाई नसल्याची आकडेवारी दर्शविते. त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील पदवीधरांचीही कमतरता नाही. या पदव्या घेणारे युवक दरवर्षी येथील शिक्षण संस्थांतून बाहेर पडत असतात. अन्य एक सिनेटर पॅट्रिक लेही म्हणाले की, या एच-१ बी व्हिसाचा उपयोग अमेरिकी कर्मचाऱ्यांसाठी केला पाहिजे. त्यांना कामावरून कमी करण्यासाठी नाही.