शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

वैज्ञानिक चक्रावले; छोट्याशा ता-याभोवती महाकाय ग्रहाचे भ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:03 IST

पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या महाकाय ग्रहाचा शोध लावणारे वैज्ञानिक त्याच्या खगोलीय समीकरणांनी चक्रावून गेले असून, एखाद्या ताºयाभोवती ग्रहमाला कशी तयार होते याविषयीच्या सर्वमान्य सिद्धान्ताची फेरतपासणी करावी लागण्याची शक्यता त्यांना वाटत आहे.

लंडन : पृथ्वीपासून ६०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका नव्या महाकाय ग्रहाचा शोध लावणारे वैज्ञानिक त्याच्या खगोलीय समीकरणांनी चक्रावून गेले असून, एखाद्या ताºयाभोवती ग्रहमाला कशी तयार होते याविषयीच्या सर्वमान्य सिद्धान्ताची फेरतपासणी करावी लागण्याची शक्यता त्यांना वाटत आहे.या ग्रहाचे नव्या वैज्ञानिकांनी ‘एनजीटीएस-१बी’ असे नामकरण केले आहे. याचे आकारमान आपल्या ग्रहमालेतील बुध ग्रहाएवढे आहे, पण तो ज्या विझत चाललेल्या, तांबूस रंगाच्या ताºयाभोवती (ड्वार्फ स्टार) परिक्रमा करत आहे त्या ताºयाचा आकार मात्र या ग्रहाच्या तुलनेत निम्मा आहे! ब्रह्मांडात कुठेही एवढ्या लहान ताºयाच्या ग्रहमालेत त्याच्याहून कितीतरी मोठा ग्रह असू शकेल याची कल्पनाही वैज्ञानिकांनी कधी केली नव्हती. आजवर जेवढ्या ग्रह-ताºयांचा शोध घेण्यात आला आहे त्यात या नव्या ग्रह-ताºयाच्या जोडगोळीच्या आकारमानाचे गुणोत्तर बुचकळ्यात टाकणारे आहे. या नव्या ग्रहाचा शोध लावणाºया वैज्ञानिक चमूचे प्रमुख व वॉरविक विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. डॅनियल बेलिस म्हणाले की, ‘एनजीटीएस-१बी’चा शोध आमच्यासाठी एक अचंबा आहे. एवढा महाकाय ग्रह एवढ्या लहानशा ताºयाभोवती परिभ्रमण करत असेल व किंबहुना करू शकेल, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती. या नव्या शोधाने ग्रहमालांच्या निर्मितीबद्दलचे आजवरचे संचित ज्ञान पुन्हा तपासून पाहावे लागेल. (वृत्तसंस्था)नव्या ग्रहाचे अनोखेपण- पृथ्वीपासूनचे अंतर-६०० प्रकाशवर्षे- आकारमान-आपल्या बुध ग्रहाएवढे- वायुरूप महाकाय गोळा- पृष्ठभागाचे तापमान ५३० सेंटीग्रेड- ताºयाभोवती प्रदक्षिणाकाळ २.६ दिवस- केंद्रीय ताºयापासूनचे अंतर पृथ्वी वसूर्यामधील अंतराच्या ३ टक्के‘एनजीटीएस-१ बी’ हा ग्रह महाकाय असला तरी तो शोधणे कठीण होते, कारण त्याचा तारा खूपच लहान व अंधूक आहे. खरेतर ब्रह्मांडात लहान तारेच सर्वसाधारणपणे आढळतात. त्यामुळे अशा छोट्या ताºयांभोवती फिरणारे त्यांच्याहून मोठे ग्रह आणखीही असू शकतील. त्यांचा शोध आता घ्यावा लागेल. ‘एनजीटीएस’ प्रकल्पाच्या १० वर्षांच्या परिश्रमानंतर हा अनोखा ग्रह सापडणे रोमांचक आहे. - प्रा. पीटर व्हीटले, वॉरविक विद्यापीठ

टॅग्स :Londonलंडन