ऑनलाइन लोकमतदार एस सलाम, दि. 7 - अंरूद दरीत शाळेची बस उलटून झालेल्या भीषण अपघातात ३२ विद्यार्थ्यांंसह दोन शिक्षक तथा बसचा चालक ठार झाल्याची घटना टांझानियाच्या आरुशा प्रांतात शनिवारी घडली. नुकत्याच झालेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असताना हा अपघात झाला. मृत मुले ही इयत्ता सातवीचे विद्यार्थींं असून, दुसर्या शाळेत कार्यक्रमासाठी जात असताना ही भीषण दुर्घटना घडली. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन मगुफुली यांनी राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक दोषामुळे अथवा मानवी चुकीमुळे झाला, याचा तपास टांझानिया पोलीस करीत आहे.
स्कूल बस उलटली; ३२ विद्यार्थ्यांंसह तीन अन्य ठार
By admin | Updated: May 7, 2017 01:49 IST