शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणे, शांती प्रक्रियेत भारताचे सहकार्य नाही

By admin | Updated: August 30, 2015 00:37 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध राहण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; पण भारताचे सहकार्य मिळत नाही, असा अजब दावा पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा रद्द झाल्यामुळे उभय देशांतील संबंधात दरी निर्माण झालेली असतानाच पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी हे वक्तव्य केले आहे, हे विशेष. ते म्हणाले की, काश्मीरमधील नेत्यांसोबत आमच्या संभाव्य चर्चेबाबत भारत सरकारने घेतलेला आक्षेप योग्य नव्हता. तथापि, दोन्ही देशांतील चर्चेदरम्यान काश्मीरच्या मुद्यावर आक्षेप नोंदवत भारताने एक प्रकारे सुरक्षा आणि स्थिरताच अडचणीत आणल्याचा अजब दावाही निसार अली खान यांनी केला आहे.दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री निसार अली खान यांनी काल ब्रिटनचे विदेश सचिव फिलिप हेमंड यांची लंडनमध्ये भेट घेतली. सद्य परिस्थितीची त्यांना माहिती दिल्याचे सांगून निसार अली खान म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काश्मीर मुद्दा हा महत्त्वाचा आहे. तथापि, हाच मुद्दा अडथळाही ठरत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने उभयदेशांना चर्चेद्वारे समस्या सोडविण्याचे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)