शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

येमेन बंडखोरांविरुद्धची सौदीची सैन्य मोहीम समाप्त

By admin | Updated: April 23, 2015 01:30 IST

सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील आघाडीच्या सैन्याने येमेनधील बंडखोरविरोधी हवाई हल्ला मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

रियाध : सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील आघाडीच्या सैन्याने येमेनधील बंडखोरविरोधी हवाई हल्ला मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दरम्यान, इराणने या निर्णयाचे स्वागत करत हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे.‘डिसाइसिव्ह स्टॉर्म’ नामक या मोहिमेने आपले लक्ष्य प्राप्त केल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. तथापि, हुथी बंडखोरांना रोखण्यात या मोहिमेस म्हणावे तसे यश प्राप्त झाले नसल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.आघाडीच्या सैन्याने येमेनमधील हुथी बंडखोरांना रोखण्यासाठी जवळपास महिनाभर हवाई हल्ले केले. मंगळवारी ताज्या हवाई हल्ल्यात सुमारे ३० जण मारले गेले होते. यात बहुतांश सामान्य नागरिकांचा समावेश होता. हुथी बंडखोरांच्या ताब्यातील येमेनमधील तिसरे शहर असलेल्या तैझ येथील तळावर हवाई हल्ला केल्यानंतर सौदीने ही मोहीम समाप्त करण्याची घोषणा केली. सौदी आघाडीच्या सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल अहमद अल् असीरी यांनी रियाध येथे येमेन सरकार आणि राष्ट्राध्यक्ष अब्दुर्बुह मन्सूर हादी यांच्या आग्रहावरून मोहीम समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वृत्तसंस्था)