शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या मदरशांना सौदीकडून साहाय्य

By admin | Updated: January 31, 2016 00:31 IST

सौदी अरेबियाने असहिष्णुतेच्या निर्यातीसाठी पैशांची त्सुनामी सोडली असून, पाकिस्तानातील २४ हजार मदरशांनाही तोच आर्थिक साहाय्य पुरवत आहे, असे एका ज्येष्ठ अमेरिकन सिनेटरने सांगितले.

वॉशिंग्टन : सौदी अरेबियाने असहिष्णुतेच्या निर्यातीसाठी पैशांची त्सुनामी सोडली असून, पाकिस्तानातील २४ हजार मदरशांनाही तोच आर्थिक साहाय्य पुरवत आहे, असे एका ज्येष्ठ अमेरिकन सिनेटरने सांगितले. सौदी इस्लामी कट्टरवादाला प्रोत्साहन देत असून, अमेरिकेने त्यावरील आपले मौन सोडायला हवे, असे सिनेटर ख्रिस मर्फी म्हणाले. पाकिस्तान हे याचे उत्तम उदाहरण आहे. तेथे सौदीकडून येणाऱ्या पैशांचा वापर द्वेष आणि दहशतवादास उत्तेजन देणाऱ्या धार्मिक शाळांच्या मदतीसाठी करण्यात येत आहे. कौन्सिल आॅफ फॉरेन रिलेशन्स या अमेरिकी विचार समूहाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मर्फी पुढे म्हणाले की, पाकिस्तानातील हजारो मदरशांना सौदीकडून आर्थिक मदत मिळत आहे. सौदीसोबत असलेल्या आमच्या आघाडीचे अनेक सकारात्मक पैलू असले तरी सौदी इस्लामी कट्टरवादी विचारसरणाली उत्तेजन देत असल्याचे कटू सत्य असून इस्लामी कट्टरवादाविरुद्धची आमची लढाई अधिक केंद्रित आणि गुंतागुंतीची झालेली असताना सौदीच्या या पैलूकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही, असेही मर्फी म्हणाले. सौदी जोपर्यंत त्याची ही मोहीम थांबवत नाही तोपर्यंत त्याला लष्करी साहाय्य देणे अमेरिकेने थांबवायला हवे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)- सौदी अरेबिया कट्टरवादी वहावी इस्लाम विचारसरणीच्या प्रसार मोहिमेसाठी जगभरातील मदरसे व मशिदींना आर्थिक मदत देत असून, १९६० च्या दशकापासून त्याने अशी १०० अब्ज डॉलरहून अधिक मदत दिली आहे. - सौदीच्या या प्रसार मोहिमेची तुलना एकेकाळच्या सोव्हिएत संघाशी केल्यास सौदीने कट्टर इस्लामी विचारांच्या प्रसारासाठी पैशांची त्सुनामी सोडल्याचे दिसून येते.- सोव्हिएत संघाने १९२० ते १९९१ दरम्यान आपल्या साम्यवादी विचारसरणीचा इतर देशांत प्रसार करण्यासाठी सात अब्ज डॉलर खर्च केले होते.