शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सानिया मार्टीनानं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद

By admin | Updated: January 29, 2016 14:18 IST

सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या जोडीने आपला सलग ३६ वा विजय नोंदवतानाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीस या जोडीने आपला सलग ३६ वा विजय नोंदवतानाच ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले आहे. सानिया मार्टिना जोडीने जिंकलेले हा सलग तिसरे ग्रँड स्लॅमही आहे. महिला दुहेरीचे पहिले मानांकन असलेल्या या जोडीने  अँड्री लवाकोवा व ल्युसिया हार्देका या जोडीचा ७ - ६, ६ -३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला आहे. 
यापूर्वीचा महिला मिश्र जोडीचा विक्रम जाना नोवोतना व हेलेना सुकोवा या जोडीच्या नावावर असून १९९० मध्ये या जोडीने ४४ सामने जिंकले होते. हा विक्रम मोडण्यासाठी सानिया मार्टिना जोडी अवघे ८ सामने दूर आहे. 
गेल्या वर्षी जागतिक टेनिस संघटनेने सानिया मार्टीनाला डबल्स टीम ऑफ दी इयरने गैरवले आणि तेव्हापासून या दोघी अपराजित राहिल्या आहेत. सँटिना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीने ४६पैकी ४३ सामने जिंकले असून यामध्ये युएस ओपन, गुंगझू, वुहान, बीजिंग, सिंगापूर, ब्रिस्बेन व सिडनी येथील विजेतेपदांचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन ही माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे, ही ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लँमसारखीच आहे असं सांगणा-या सानियाने मार्टिना हिंगीसचं कौतुक करताना, ती एक चँपियन खेळाडू असून तिच्यासोबत खेळायची संधी मिळणं हा समाधानाचा भाग असल्याचे उद्गार काढले आहेत.
तर, मार्टिनानेही सानियाचे आभार मानताना, ही अत्यंत खडतर स्पर्धा होती, आणि तुझ्याखेरीज इथपर्यंत पोचता आलं नसतं असं सांगत तिचं कौतुक केलं आहे.