शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

टाटाकडून ब्रिटनमधील एका पोलाद प्रकल्पाची विक्री

By admin | Updated: April 12, 2016 02:49 IST

टाटाने आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या ब्रिटिश पोलाद प्रकल्पापैकी ‘लाँग प्रॉडक्टस् युरोप’ हा प्रकल्प गुंतवणूक कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विकला आहे. या सौद्याबरोबर ब्रिटनमधील आपला

लंडन : टाटाने आर्थिक संकटात सापडलेल्या आपल्या ब्रिटिश पोलाद प्रकल्पापैकी ‘लाँग प्रॉडक्टस् युरोप’ हा प्रकल्प गुंतवणूक कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विकला आहे. या सौद्याबरोबर ब्रिटनमधील आपला पोलाद प्रकल्प विकण्याच्या प्रक्रियेलाही टाटाकडून रीतसर प्रारंभ करण्यात आला आहे.टाटा स्टील युके ही उपकंपनी टाटांचा ब्रिटनमधील व्यवसाय पाहते. या कंपनीनील आपली संपूर्ण भागीदारी टाटा विकून टाकणार आहे. त्यासाठी केपीएमजी एलएलसी या कंपनीची प्रक्रिया सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय स्लॉटर अँड मे या कंपनीची कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एका अधिकृत निवेदनात टाटाने म्हटले की, लाँग प्रॉडक्टस् युरोप या व्यवसायाची फॅमिली इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्रेबुल कॅपिटलला विक्री करण्यात आली आहे. त्यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण व्यवसाय ग्रेबुल ताब्यात घेईल. त्यात संपत्ती आणि देणेदारीचा समावेश आहे. काही अटींची पूर्तता झाल्यानंतर हा व्यवहार पूर्ण होईल. कराराचे हस्तांतरण, काही ठराविक सरकारी मंजुऱ्या आणि समाधानकारक आर्थिक व्यवस्था यांचा त्यात समावेश आहे.दरम्यान, ब्रिटनमधील टाटाचे पोलाद प्रकल्प खरेदी करण्याची इच्छा प्रसिद्ध उद्योगपती संजीव गुप्ता यांनी या आधीच व्यक्त केली आहे. कंपनीच्या स्टीलच्या चार हजार कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे संजीव गुप्ता यांनी म्हटले आहे. पोर्ट टालबोट येथील हा पोलाद कारखाना ब्रिटनमधील सगळ्यात मोठा असून तो विक्रीस निघाला आहे. लिबर्टी हाऊस ग्रुपचे गुप्ता हे प्रमुख आहेत. त्यांनी टाटा स्टीलची जबाबदारी घेण्यात गोडी दाखविली आहे.विकण्यात आलेल्या या कंपनीच्या ब्रिटनमधील प्रकल्पात ४,४00 कामगार आहेत, तसेच फ्रान्समध्ये ४00 कामगार आहेत. ३१ मार्च रोजी टाटा स्टील युरोपच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत हा व्यवसाय विकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.टाटाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ग्रेबुल कॅपिटलसोबत संभाव्य प्रकल्प विक्रीसाठी वाटाघाटी करण्यासाठी इरादापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. लाँग प्रॉडक्टस् युरोपचे कार्यकारी चेअरमन बिमलेंद्र झा यांनी सांगितले की, हा विक्री व्यवहार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, तसेच संभाव्य खरेदीदारासाठीही हा सौदा आकर्षक आहे.