शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दी ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर स्टॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 18:19 IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही. वेस्ट इंडिजमध्ये दी ब्रायन लारा स्टेडियम तयार झाले आहे. या स्टेडियममधील एका स्टॅण्डला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. वेस्ट इंडिजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्या नावाने त्रिनिदादमध्ये उभारण्यात आलेल्या ैदी ब्रायन लाराह्ण या स्टेडियमचे लवकरच उद्घाटन होणार आहे. लारा इलेव्हन आणि सचिन इलेव्हन या सामन्याने स्टेडियमचे उदघाटन करण्यात येईल. लारा आणि तेंडुलकर हे एकाच दशकात खेळलेले महान फलंदाज आहेत. वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असूनही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.नव्वदीच्या दशकात दोघांची तुलना देखील केली गेली. परंतु एकमेकांकडे या दोघांनी केव्हाच स्पर्धक म्हणून पाहिले नाही. संघाला विजय मिळवून देण्यासाठीची धडपड आणि त्यातून झालेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर सचिन, लाराने नव्वदीचे दशक गाजविले. टी अँड टी स्पोर्ट्स चे चेअरमन मायकल फिलिप्स यांनी सांगितले की, ब्रायन लाराच्या सल्ल्यानुसार स्टेडियममधील एका स्टॅण्डला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. स्टेडियम आणि अकादमी संबंधांतील नियमांच्या निर्णय प्रक्रियेत आम्ही लाराचा समावेश केला आहे.