शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांचे सार्वमत

By admin | Updated: May 12, 2014 00:13 IST

डोनस्टेक ( युक्रेन) पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांनी सार्वमतासाठी मतदान घेण्यास सुरुवात केली असून, युक्रेन पुन्हा एकदा फुटणार असे चिन्ह आहे. अमेरिकेने हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून, पाश्चिमात्य देश युक्रेनमध्ये नागरी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करीत आहेत.

डोनस्टेक ( युक्रेन) पूर्व युक्रेनमधील दोन शहरांत रशियन समर्थकांनी सार्वमतासाठी मतदान घेण्यास सुरुवात केली असून, युक्रेन पुन्हा एकदा फुटणार असे चिन्ह आहे. अमेरिकेने हे सार्वमत बेकायदेशीर असल्याचे म्हटले असून, पाश्चिमात्य देश युक्रेनमध्ये नागरी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त करीत आहेत. रशियन समर्थकांच्या ताब्यात असणार्‍या बारा शहरांपैकी दोन शहरांत हे सार्वमत घेण्यात आले असून, यामुळे युक्रेनमधील राजकीय समस्या अधिकच तीव्र होईल, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे रशिया व पाश्चिमात्य देश यांच्यातील तणाव वाढेल, असेही दिसत आहे. येस वा हो असे मत फक्त रशियाकडून मान्य केले जाईल; पण त्यामुळे युक्रेनमधील अध्यक्षीय निवडणुकांचे महत्त्व कमी होईल. येत्या दोन आठवड्यांत युक्रेनमध्ये निवडणुका होत असून, त्यानंतर युक्रेनला बर्‍यापैकी स्थैर्य मिळेल असे युरोपियन युनियनचे मत आहे. अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना पूर्व युक्रेनमध्ये हिंसाचार चालू असून, रात्रभर स्फोटांचे आवाज चालू आहेत. पूर्व युक्रेनमधील घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारची कारवाई सुरू आहे. रशियन बंडखोर सशस्त्र असून, डोनस्टेक व लुगान्स या दोन शहरांत मतदान चालू असल्याने त्यांनी या शहरात आश्रय घेतला आहे. युक्रेनच्या नियमानुसार सार्वमत बेकायदेशीर असून, तो देश फोडण्याचा प्रयत्न समजला जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा आंतरराष्ट्रीय नियमांचा तसेच युक्रेनच्या अखंडत्वाचा भंग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या शहरांनी सार्वमतात स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतल्यास नागरी व्यवस्था कोलमडेल व तेथील अर्थव्यवस्थेचा विनाश होईल, असा इशारा युक्रेनचे अंतरिम अध्यक्ष ओलेक्सांदर तुर्चीनोव्ह यांनी दिला आहे.