शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

रशियाचा गॅस पाईपलाईन प्रकल्प बासनात

By admin | Updated: December 3, 2014 01:17 IST

काळ्या समुद्रातून बल्गेरियाला व सर्बियामार्गे आॅस्ट्रियाला गॅस वाहून नेण्याचा रशियाचा प्रस्तावित साऊथ स्ट्रीम गॅस पाईपलाईन प्रकल्प आपण गुंडाळणार

मॉस्को : काळ्या समुद्रातून बल्गेरियाला व सर्बियामार्गे आॅस्ट्रियाला गॅस वाहून नेण्याचा रशियाचा प्रस्तावित साऊथ स्ट्रीम गॅस पाईपलाईन प्रकल्प आपण गुंडाळणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. या प्रकल्पामागे कधी आग्नेय युरोप भागात रशियाचा दबदबा निर्माण करण्याचा उद्देश होता. मात्र, रशिया व पाश्चात्त्य देशातील वाढत्या तणावामुळे या प्रकल्पाला बळी पडावे लागले. पुतीन यांच्यासाठी हा दुर्मिळ राजनैतिक पराभव मानला जात आहे. ही पाईपलाईन आता तुर्कीला नेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. ही पाईपलाईन अस्तित्वात आणण्यातील अपयश हे युरोपसाठी नुकसानदायक असल्याचे सांगून पुतीन यांनी ब्रुसेल्सच्या दुराग्रहामुळे हे घडल्याचा आरोप केला. पुतीन यांनी क्रिमियाचा घास घेत पूर्व युक्रेनमध्ये बंडखोरी घडवून आणली असताना अमेरिका आणि युरोपियन युनियनने त्यांच्याविरुद्ध फारसे काही केले नसल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर रशियाला त्याचा भव्य प्रकल्प गुंडाळावा लागल्याकडे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा आणि युरोपियन युनियनचा विजय म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. रशियाने २००७ मध्ये व्यावसायिक हेतूने २२ अब्ज डॉलरचा हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. (वृत्तसंस्था)