शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचा नागरी वस्त्यांवर हल्ला; युक्रेनमध्ये १७ ठार; मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 05:41 IST

झापोरिझिया येथील अणुप्रकल्पावर रशियाने याआधीच कब्जा मिळविला आहे. या अणु प्रकल्पापासून जरा दूर अंतरावर असलेल्या भागात रशियाने गेल्या दोन दिवसांत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.

कीव्ह : युक्रेनमधील झापोरिझियातील नागरी वस्त्यांवर रशियाच्या लष्कराने रविवारी पहाटे साडेचार वाजता क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ४९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश आहे. 

या हल्ल्यामध्ये पाच इमारतींचे मोठे नुकसान झाले तसेच २४ कार भस्मसात झाल्या. सदर घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरी वस्त्यांवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा युक्रेनने निषेध केला आहे.

झापोरिझिया येथील अणुप्रकल्पावर रशियाने याआधीच कब्जा मिळविला आहे. या अणु प्रकल्पापासून जरा दूर अंतरावर असलेल्या भागात रशियाने गेल्या दोन दिवसांत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यामुळे झालेल्या हानीने वीजनिर्मिती केंद्राकडून या अणुप्रकल्पाला होणारा वीजपुरवठा बंद झाला आहे. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरद्वारे वीजनिर्मिती करून आता हा अणुप्रकल्प चालविण्याची वेळ आली आहे. तशी यंत्रणा या झापोरिझियाच्या अणुप्रकल्पात आहे.

रशिया व क्रिमिया यांना जोडणाऱ्या १९ किमी लांबीच्या पुलावर शनिवारी झालेल्या ट्रक बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रशियाने झापोरिझियामध्ये पुन्हा हल्ले केेले.  (वृत्तसंस्था)

झापोरिझियामध्ये रशियाला होतोय अद्यापही विरोधझापोरिझियामध्ये रशियाला अद्यापही तेथील नागरिक व युक्रेनच्या सैन्याशी संघर्ष करावा लागत आहे. तो दडपून टाकण्यासाठी रशियाने झापोरिझिया येथे हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनचे लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन आणि झापोरिझिया हे प्रदेश रशियात विलीन करण्यात आल्याचे पुतीन सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या चार प्रदेशांमध्ये घेतलेल्या सार्वमतात तेथील नागरिकांनी रशियात विलीन होण्याच्या बाजूने कौल दिल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला होता. या प्रदेपुतीन यांनी विलिनीकरणाचा करारही घडवून आणला. मात्र हे विलिनीकरण अवैध असल्याची टीका युक्रेन, अमेरिकेसह आणखी काही देशांनी केली आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया