पॅरिस : जगातील सर्वोत्कृष्ट फॉरवर्डपैकी एक असलेला पोर्तुगालचा फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि त्याची रशियन मैत्रीण मॉडेल इरिना शायेक हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत़रोनाल्डो म्हणाला, जवळपास पाच वर्षे आमची मैत्री होती; मात्र आता आमची मैत्री संपुष्टात आली आहे़ आम्ही दोघांनीही सहमतीने हा निर्णय घेतला आहे़ माझ्या खाजगी जीवनातील ही महत्त्वाची घटना मी सार्वजनिक केली आहे़ कारण यानंतर कुणीही आमच्या संबंधांबद्दल तर्कवितर्क लावणार नाही, असेही त्याने सांगितले़गत आठवड्यात रोनाल्डोला सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला होता़ याप्रसंगी इरिना उपस्थित नव्हती़ तेव्हाच या दोघांची मैत्री संपुष्टात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती़ आज रोनाल्डोने अधिकृतरीत्या जाहीर केले़ विशेष म्हणजे रोनाल्डोला क्रिस्टियानो ज्युनिअर नावाचा चार वर्षांचा मुलगा आहे; मात्र या मुलाची आई कोण आहे, हे आजपर्यंत जगासमोर आलेले नाही़ (वृत्तसंस्था)
रोनाल्डो-इरिना एकमेकांपासून दुरावले
By admin | Updated: January 22, 2015 00:24 IST