शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रोहिंग्या निर्वासितांना साथीच्या आजारांचा धोका; पाच लाख लोकांची अवस्था अतिशय वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 02:33 IST

येथील निर्वासितांच्या छावणीत सुमारे ५ लाख रोहिंग्या मुस्लिम अत्यंत भीषण स्थितीत राहत असून, गलिच्छ बनलेल्या या परिसराला साथरोगांचा गंभीर धोका आहे.

कोक्स बाजार (बांगलादेश) : येथील निर्वासितांच्या छावणीत सुमारे ५ लाख रोहिंग्या मुस्लिम अत्यंत भीषण स्थितीत राहत असून, गलिच्छ बनलेल्या या परिसराला साथरोगांचा गंभीर धोका आहे.म्यानमारमधून बाहेर पडलेले रोहिंग्या मुस्लिम मोठ्या प्रमाणात कोक्स बाजार छावणीत येत आहेत. ही जगातील सर्वांत मोठीनिर्वासित छावणी बनली आहे.अत्यंत कमी जागेत हे लोक राहत आहेत. तसेच पिण्याचे स्वच्छपाणी आणि स्वच्छतागृहांचीपुरेशी सोयही नाही. त्यामुळे हा संपूर्ण परिसर साथ रोगांच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे.संयुक्त राष्टÑांनी या निर्वासितांच्या छावणीवर महासंकट घोंघावत असल्याचा इशारा दिला आहे. साथरोग पसरल्यास त्याचा मुकाबला करण्याची तयारी येथे नाही.या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे साथींचा धोकाआणखी वाढला आहे. अतिसाराच्या रुग्णांची संख्या येथे वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलांमध्ये हा आजार अधिक आहे. निर्वासित लोक उघड्यावर शौचास बसतात.पाऊस ही घाण तिथल्या पाण्याच्या स्रोतांत आणून मिसळवितो. हेच पाणी लोक पितात.या छावणीत आजारी निर्वासितांना वैद्यकीय सेवादेण्यासाठी एकच डॉक्टर आहे.त्याच्या क्लिनिकपुढे रुग्णांच्या रांगा असतात. पावसातही लोक रांगा सोडत नाहीत. डॉ. अलामुल हक रोज४00 यांनी सांगितले की, आधीपालक एक-दोन मुले घेऊन क्लिनिकमध्ये येत. आता तीन ते चार मुले सोबत असतात.ना पाणी, ना स्वच्छतागृहेएका रोहिंग्या व्यक्तीने सांगितले की, पिण्याच्या पाण्यासाठी लांबच लांब रांग असतात. पाणी पुरेसे मिळत नाही. हसीना बेगम या रोहिंग्या महिलेने सांगितले की, संडाससाठी शेकडो लोक रोज रांगेत उभे राहतात.मुलांसाठी ही मोठी समस्या आहे. डोंगराच्या बाजूने काही संडास आहेत. पण ते नुसतेच खड्डे आहेत. ते आता मलमूत्राने भरून गेले आहेत.