शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या हेरगिरीचे अमेरिकेने ‘एनएसए’ला दिले होते अधिकार

By admin | Updated: July 2, 2014 03:51 IST

एका अमेरिकी न्यायालयाने २०१० मध्ये भाजपासह जगभरातील पाच राजकीय पक्षांची हेरगिरी करण्याचे अधिकार देशाच्या प्रमुख गुप्तहेर संघटनेस दिले होते.

वॉशिंग्टन : एका अमेरिकी न्यायालयाने २०१० मध्ये भाजपासह जगभरातील पाच राजकीय पक्षांची हेरगिरी करण्याचे अधिकार देशाच्या प्रमुख गुप्तहेर संघटनेस दिले होते. एका गोपनीय दस्तावेजातून ही माहिती उघड झाली आहे. अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने (एनएसए) भाजपाखेरीज मुस्लिम ब्रदरहूड (इजिप्त), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पाकिस्तान), अमाल (लेबनॉन), बोलीव्हारियन कॉन्टिनेन्टल कॉर्डीनेटर (व्हेनेझुएला) आदी राजकीय संघटनांच्या हेरगिरीची परवानगी मागितली होेती, असे या दस्तावेजात म्हटले आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकाने सोमवारी हा दस्तावेज प्रसिद्ध केला. परदेशी गुप्तचर निगराणी न्यायालयाने २०१० मध्ये १९३ विदेशी सरकारे तसेच परदेशी पक्ष, संघटना आणि इतर प्रतिष्ठानांच्या हेरगिरीस मुभा दिली होती. या यादीत भारताचा समावेश होता. विदेशी गुप्तचर माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने एनएसए या पक्ष आणि संघटनांची हेरगिरी करू शकते, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. एनएसएचा माजी ठेकेदार एडवर्ड स्नोडेन याने हा दस्तावेज वॉशिंग्टन पोस्टला पुरविला आहे. अमेरिका जगभरातील नागरिकांची त्याचप्रमाणे राष्ट्रप्रमुखांची हेरगिरी करीत असल्याचे स्नोडेननेच उघडकीस आणले होते. यावरून अमेरिकेविरुद्ध जगभर संताप निर्माण झाला होता. द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, ब्रिटन, कॅनडा, आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे चार देश वगळता कोणतेही विदेशी सरकार राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या कक्षेबाहेर नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे. भारत आणि भाजपावर निगराणी ठेवण्याच्या प्रश्नावर थेट उत्तर न देता एनएसएच्या प्रवक्त्या वॅनी व्हिनेस म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रीय गुप्तहेर संघटनेचे संचालक आणि इतर विभागांच्या गुप्तचर गरजांनुसार एनएसए विदेशी गुप्तचर माहिती गोळा करते. (वृत्तसंस्था)