शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन बौद्ध स्तूपाचा चीनमध्ये जीर्णोद्धार

By admin | Updated: September 18, 2015 03:08 IST

सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

नांगचेंग : सम्राट अशोक याने चीनला भगवान बुद्धाची आठवण म्हणून पाठविलेल्या व दोन हजार वर्षे जुन्या स्तूपाचा जीर्णोद्धार करून त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तिबेटच्या जवळ असलेल्या चीनच्या क्विंगहाई प्रांतात या स्तूपाची प्रतिष्ठापना झाली आहे. भगवान बुद्धाचे अवशेष असलेल्या १९ स्तूपांपैकी हा एक आहे. या स्तूपाची प्रतिष्ठापना भारतीय भिक्खूने धार्मिक विधींनी केली. हा स्तूप बुद्ध धर्म भारतातून चीनमध्ये आल्याचे प्रतीक समजला जातो.या स्तूपाला अशोक खांब असून त्यात भगवान बुद्धाची सोन्याची मूर्ती आहे. लडाखमधील द्रूकप् वंशाचे आध्यात्मिक नेते ग्लॅयवँग द्रूकप् यांनी मूर्तीला अभिषेक करून तिची मंगळवारी प्रतिष्ठापना केली. आख्यायिकेनुसार अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धाला दहन करण्यात आल्यानंतर त्याच्या अनुयायांना कवटीचे एक हाड, दोन खांद्याची हाडे, चार दात आणि ८४ हजार मोत्यासारखे अवशेष मिळाले. बुद्ध धर्माच्या नोंदीनुसार सम्राट अशोकाने शाक्यमुनींचे शरीर गोळा करून जगात ते विविध ठिकाणी पाठवायच्या आधी पॅगोडासारख्या पवित्र ठिकाणी ठेवले होते. चीनला त्यापैकी १९ मिळाल्याचे समजले जाते व नांगचेंग येथील स्तूप हा त्यापैकी एक आहे. (वृत्तसंस्था)परंतु ऊन, वारा, पावसामुळे तसेच दुर्लक्षामुळे तो जमीनदोस्त झाला होता. शियान, नानजिंग आणि चीनच्या झेजियांग प्रांतातील अयुवँग येथेही आणखी तीन स्तूप सापडले आहेत. १९ स्तूपांपैकी एक स्तूप तिबेटमध्ये नांगचेंग येथील असून आणखी १५ स्तूप अज्ञात आहेत.चीनमध्ये बुद्ध धर्माचा प्रवेश झाला. त्याच्या कालक्रमानुसार नोंदी इसवी सन पूर्व ६८ पासून ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षी चीनमधील पहिले व्हाईट हॉर्स बुद्ध मंदिर लुओयांगमध्ये चिनी भिक्खू झुएनझानने बांधले. हा भिक्खू तब्बल १७ वर्षांचा समुद्र प्रवास करून भारतात पोहोचला होता. जगात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याचे सम्राट अशोकाने किती प्रयत्न केले होते याचे हा स्तूप निदर्शक आहे.