शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

रिपब्लिकन पार्टीकडून ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर

By admin | Updated: July 20, 2016 07:25 IST

रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतअमेरिका, दि. 20 - रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर केल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. ट्रम्प यांनी 1237 मताधिक्य मिळवून रिपब्लिकन पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळवली आहे. शेवटच्या मिनिटापर्यंत बंडखोरांमुळे ट्रम्प यांना उमेदवारी मिळण्याची धाकधूक लागली होती. मात्र राज्यांनी 16 उमेदवारांसाठी केलेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वाधिक मते मिळवून उमेदवारीच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी जाहीर झाल्यानं त्यांच्या मुलानंही आनंद व्यक्त केला आहे. 89 उमेदवारांमधून माझ्या वडिलांची निवड होणे हे गौरवास्पद आहे. आम्ही तुमच्यावर प्रेम करत असून, वडिलांचं अभिनंदनही केलं आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची नोव्हेंबरात होणारी निवडणूक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होईल हे आता स्पष्ट झाले आहे. आता रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात थेट निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत.

(डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर 28 टक्के अमेरिकन्स घेणार कॅनडाचा आसरा)

डोनाल्ड ट्रम्प यांच्या उमेदवारीमुळे अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला धार्मिक, वांशिक रंग चढणार आहेत. इंडियानातील प्रायमरी निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी आघाडी घेतली होती. हिलरी क्लिंटन या बराक ओबामांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होत्या आणि 'देशाच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी परराष्ट्र मंत्री' असा ओबामांनीच त्यांचा गौरवही केला. त्यांना महिला वर्गात, श्रमिकांत, कृष्णवर्णीय अमेरिकनांत आणि मध्यमवर्गीयांत मिळत असलेला पाठिंबा मोठा आहे. त्या बळावर त्या निवडणूक जिंकू शकतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

(माझ्या मंत्रिमंडळात निम्म्या महिला असतील -हिलरी)

भारताच्या दृष्टीने तर त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदी येणे हे विशेष महत्त्वाचे व लाभाचेही आहे. त्यांचा डेमॉक्रेटिक पक्ष नेहमीच भारताला अनुकूल राहिला आहे. हिलरी यांनीही त्यांच्या संबंध राजकीय कारकीर्दीत नेहमी भारताला अनुकूल अशाच भूमिका घेतल्या आहेत. याउलट ट्रम्प हे उघडपणे भारत, पाक, मेक्सिको, पूर्व युरोप व मध्य आशियाई देशांविषयी व त्यातील जनतेविषयी उथळपणे बोलत आले आहेत. त्यातला अनेकांवर असलेला त्यांचा रोष जाहीरही आहे.