शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील १२ रुग्णालये नावालाच 'धर्मादाय'; नियम पायदळी तुडवले, उपचारावरून गरिबांना लुटले
2
अर्भक गायब झाले तर रुग्णालयाचे  लायसन्स रद्द करा; सर्वोच्च न्यायालय संतापले
3
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण पोहोचलं संयुक्त राष्ट्रात, मुघलांच्या वारसांनी पत्र लिहून केली अशी मागणी 
4
Gardening Tips: किचनमधले 'हे' तीन पदार्थ उन्हाळ्यातही तुमच्या रोपांना ठेवतील ताजे-टवटवीत!
5
प्रभादेवी पूल पाडण्यास विरोध, उद्धवसेनेने राबविली सह्यांची मोहीम तर ‘मनसे’चे आंदोलन
6
चौथा अहवाल प्राप्त झाल्यावर पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल; मुख्यमंत्र्यांचे गोरखेंना आश्वासन
7
अरेरे! गर्लफ्रेंडने विवाहित बॉयफ्रेंडचे हातपाय तोडले, १५ फ्रॅक्चर; ७ वर्षांची लव्हस्टोरी, भयानक शेवट
8
बिहारसाठी ‘इंडिया’ने ६ महिने आधीच थोपटले दंड, तेजस्वी यादव व राहुल गांधी-खरगेंची चर्चा
9
दात पडला तर घाबरू नका, चक्क प्रयोगशाळेत तयार केला मानवी दात; पेशी हळूहळू खऱ्या दातांमध्ये बदलतील
10
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमुळे एलआयसी मालामाल! १००० कोटी रुपयांचा नफा कसा कमावला?
11
युक्रेन उद्ध्वस्त केल्यानंतर आता या देशांवर हल्ला करण्याची रशियाची धमकी, युरोपियन देश चिंतीत, नाटोच्या प्रमुखांची युक्रेनमध्ये धाव  
12
केएल राहुलने सासरा सुनील शेट्टींसोबत मुंबईजवळ खरेदी केली ७ एकर जमीन; काय आहे किंमत?
13
'मी संकटात असताना सलमानचा फोन आला अन्...", महेश मांजरेकरांनी सांगितला किस्सा
14
"काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही..."; मराठमोळा अजिंक्य रहाणे अन् श्रेयस अय्यरमधला Video व्हायरल
15
आरोग्य सांभाळा! चहा आणि कॉफी किती वेळानंतर होते खराब? निष्काळजीपणा ठरेल घातक
16
'उपचारासाठी लागणारा खर्च समोर ठेवला, घैसास यांची चूक नाही', आम्ही त्यांच्या पाठीशी, आयएमएची भूमिका
17
गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, बाळाची पहिली झलक दाखवत नावही सांगितलं
18
"इथे कुंपणच शेत खातंय, सरकार आत्मचिंतन करणार का?"; जयंत पाटील यांचा महायुतीवर हल्लाबोल
19
ATM in Railway: धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा
20
"मला तैमूर अन् जेहबद्दल खूप वाईट वाटतं", असं का म्हणाला इब्राहिम अली खान?

भारत आणि म्यानमारमधील संबंध नव्या टप्प्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 08:04 IST

भारत आणि म्यानमार या शेजारी देशांचे संबंध गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. राजकीय तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान या देशांमध्ये नेहमीच होत राहिले. या दोन्ही देशांचे संबंध 1993 पासून वेगाने वाढत गेले.

मुंबई, दि.5- भारत आणि म्यानमार या शेजारी देशांचे संबंध गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. राजकीय तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान या देशांमध्ये नेहमीच होत राहिले. या दोन्ही देशांचे संबंध 1993 पासून वेगाने वाढत गेले. तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी म्यानमारशी संबंध वृद्धिंगत व सुरळीत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आहेत. आशियातील या दोन देशांचे संबंध नवे पाऊल टाकत आहेत.

भारतामध्ये उगम पावलेला बौद्ध धर्म आशियातील विविध देशांमध्ये पसरत गेला. म्यानमारमध्ये आज 90 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या बौद्धधर्मिय आहेत.  म्यानमारमध्ये भारतीय वंशाचे आणि हिंदू लोकही राहतात. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या व्यवसायामुळे म्यानमारमध्ये भारतीय लोक नोकरीसाठी स्थायिक झाले होते.1937 पर्यंत म्यानमार म्हणजे तेव्हाचा ब्रह्मदेश ब्रिटिश भारताचा हिस्सा होता. 1948 साली म्यानमार स्वतंत्र झाल्यानंतर भारताने म्यानमारशी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. मात्र लष्करशाहीमुळे दोन्ही देशांचे संबंध एका मर्यादेच्यापुढे जाऊ शकले नाहीत. 1987 साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्यानमारला भेट दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधाना वेग आणला तो पी. व्ही. नरसिंहराव यांनी. 

2000 सालच्या आकडेवारीनुसार म्यानमार भारताला 22 कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या उत्पादनांची निर्यात करत होता तर भारताकडून 7.5 कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या वस्तूंची आयात करत होता. थायलंड, चीन, सिंगापूरनंतर भारत हा म्यानमारसाठी चौथ्या क्रमांकावरचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे. भारताने म्यानमार- थायलंड असा रस्तामार्ग तयार करण्यासाठी हात पुढे केला आहे. तसेच कलादान मल्टिनोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्पासही सुरुवात झाली आहे. यामध्ये कोलकाता आणि सित्वे ही बंदरे जलमार्गाने जोडली जातील व तेथून लॅशिओ हे मिझोरममधील गाव रस्तेमार्गाने जोडले जाईल. दोन्ही देशांना व्यापारासाठी याचा मोठा उपयोग होईल. 2015 साली म्यानमारमध्ये प्रदीर्घकाळ सुरु असलेल्या लष्करशाहीच्या जागी लोकशाही सरकार सत्तेत आले. त्यामुळे म्यानमारमध्ये स्थिरता येईल अशी भारताची अपेक्षा आहे. तसेच रोहिंग्या स्थलांतरितांचा म्यानमारबाहेर पडणारा लोंढा थांबवून तेथे चाललेले तणावाचे प्रसंग हे सरकार संपुष्टात आणेल अशीही भारताची अपेक्षा आहे. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमुळे भारतात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रोहिंग्यांच्या प्रश्नावर विचार सुरु होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी